भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानने काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी आपल्या संघाची गोषणा केली. यात राशिद खान याचे पुनरागमन झाले होते. पण ताज्या माहितीनुसार राशिद भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही.
मागच्या दोन महिन्यांपासून राशिद खान एकही सामना खेळला नाहीये. पाठिच्या शस्त्रक्रियेनंतर अष्टपैलू अद्याप पूर्णपणे फिट झाला नाहीये. याच कारणास्तव राशिद भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळताना दिसणार नाहीये. मागच्या काही दिवसांपासून राशिदने संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे. पण अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदरान याने स्पष्ट केले की, राशिद भारताविरुद्ध खेळणार नाही.
“तो पूर्णपणे फिट नाहीये. पण संघासोबत प्रवास करत आहे. तो लवकरात लवकर फिटनेस मिळवेल, अशी अपेक्षा आहे. तो डॉक्टर्सच्या देखरेखीत रिहॅब करत आहे. भारताविरुद्धच्या या मालिकेत संघाला त्याची कमी जाणवेल,” असे कर्णधार म्हणाला. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 14 आणि 17 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. (Rashid Khan withdraws from series against India)
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ –
इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन -उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकवीर ठरली कर्णधार Alyssa Healy, परभवासह भारातने मालिकाही गमावली
Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास