---Advertisement---

‘भारतात अजून असा कोणी जन्माला नाही जो, विराटला…’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे खळळबळजनक विधान

On: शनिवार, जुलै 16, 2022 11:01 AM
Virat-Kohli
---Advertisement---

सध्या भारतात आणि संपूर्ण जगभरात क्रिकेटचा विषय निघाला की एक नाव प्रामुख्याने समोर येते ते नाव म्हणजे भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली. या गोष्टीमागे एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे विराट कोहलीचा खराब फॉर्म. क्रिकेटमधील अनेक जाणकार आणि माजी दिग्गज खेळलाडू यावरून वादविवाद करत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की विराटला आणखी संधी मिळायला हवी, तर याउलट अनेक जण विराटला ट्रोल करत आहेत. अशसातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ याने विराटचे समर्थन करणारे विधान केले आहे. 

पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ म्हणतो की, “भारतामध्ये विराट कोहलीला संघातून वगळू शकेल असा कोणताही निवडकर्ता नाही. कोहलीची २०२२ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजीची सरासरी २५.५० आहे. कोहलीची ही एका कॅलेंडर वर्षातील सर्वात खराब कामगिरी आहे. पण असे असूनही कोहलीला वगळता येणार नाही.” शिवाय कोहलीला संघातून वगळले जाऊ शकते का, असा प्रश्न लतीफला विचारण्यात आला, तेव्हा तो त्याच्या ‘कॉट बिहाइंड’ या यूट्यूब चॅनलवरील संभाषणात म्हणाला की, “विराटला वगळू शकेल असा कोणताही निवडकर्ता भारतात जन्माला आला नाही.”

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-२० मध्ये नाही
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कोहलीचे नाव भारतीय संघात नाही. कोहलीचा समावेश न करण्याचे कारण बोर्डाने दिलेले नाही. मात्र, खुद्द कोहलीने आधीच विश्रांती मागितल्याचे वृत्त आहे. कोहलीला आशिया चषक आणि त्यानंतर यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी स्वत:ला तयार करायचे आहे. त्यामुळे त्याने या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

इंग्लंडमध्ये अपयशी ठरला
भारताच्या माजी कर्णधाराने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ १६ धावा केल्या. याआधी टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये कोहलीने केवळ १ आणि ११ धावा केल्या होत्या. यावरून सध्या विराट खराब फॉर्मसोबत झुंजत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणून भारताला २०२३च्या विश्वचषकात महत्वाचे स्थान, विश्वविजेत्या इंग्लंडला डावलत टीम इंडियाला पहिले प्राधान्य

‘…म्हणून मी रात्री विराट कोहलीला समर्थन करणारी पोस्ट शेअर केली’, बाबर आझमने दिले स्पष्टीकरण

आता ठरलंय! ‘हे’ १२ संघ खेळणार आयसीसी टी२० विश्वचषक, वाचा कधी आणि कुणाशी भिडणार भारत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---