---Advertisement---

दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला केकेआरचा ‘हा’ गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 5:03 PM
Kolkata-Knight-Riders-KKR
---Advertisement---

सर्वत्र सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत या हंगामातील २४ सामने झाले असून यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रदर्शन दमदार राहिले आहे. त्यांनी खेळलेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत. यादरम्यान शुक्रवारी (१५ एप्रिल) कोलकाता संघासाठी एक वाईट बातमी पुढे आली आहे. कोलकाताचा वेगवान गोलंदाज रसिक सलाम दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. 

आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे. कोलकाताकडून या हंगामात २ सामने खेळणारा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज सलाम हा त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाल्यामुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्याच्याजागी आता कोलकाताने हर्षित राणा याला ताफ्यात सहभागी केले आहे. दिल्लीकर हर्षितला कोलकाता संघाने २० लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले आहे. 

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

२ वर्षांच्या बंदीनंतर केले होते पुनरागमन
सलामच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. परंतु त्याला त्या हंगामात केवळ एक सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्या हंगामात वय फसवणूकीच्या आरोपामुळे बीसीसीआयने सलामवर आयपीएलमधून २ वर्षांची बंदी घातली होती. तो त्यावेळी १९ वर्षांचा होता, परंतु त्याने स्वतला १७ वर्षांचे सांगितले होते.

त्यानंतर चालू हंगामातून त्याने आयपीएलमध्ये पुनमरागमन केले होते. परंतु केवळ २ सामने खेळल्यानंतर त्याला संपूर्ण हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. सलामने आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.

दीपक चाहरही संपूर्ण हंगामातून बाहेर
याखेरीज चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात महागडा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हादेखील संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो या हंगामातील एकही सामना खेळू शकला नव्हता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो त्याच्या दुखापतीवर काम करत होता. परंतु यादरम्यान त्याच्या पाठीचे जुने दुखणे वर आल्यानंतर तो संपूर्ण हंगामात अनुपलब्ध असेल.

दिल्ली कॅपिटल्सच्या फिजिओनांही कोरोनाची लागण
तसेच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्याबाबतही मोठे अपडेट आले आहे. त्यांचा कोविड-१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! दीपक चाहर अखेर आयपीएलमधून बाहेर, सीएसकेला मोठा धक्का

भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतो ‘हा’ युवा क्रिकेटर, टी२० संघाबद्दल माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

‘त्या’ सामन्यानंतर शास्त्रींच्या प्रशिक्षक करिअरला लागला झटका; भारताचे २ पराभव देतायत अजूनही टेन्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---