---Advertisement---

संघर्ष करत असलेल्या राजस्थान रॉयल्यच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ दिग्गज फलंदाज

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 6:20 PM
---Advertisement---

आयपीएल लीगच्या पहिल्या सत्राचे विजेते पद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल 2021ची सुरूवात खूपच खराब झाली आहे. यंदाच्या मोसमात राजस्थान संघ खूपच अडचणीत सापडलेला दिसत आहे. यंदाच्या मोसमात या संघाने चारपैकी एक सामना जिंकला असून तीन सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर दुसरीकडे संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होऊन ताफ्यातून बाहेर पडत आहेत.

आयपीएल 2021 सुरू होण्यापुर्वीच या संघातील मुख्य वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर पहिला सामना खेळल्यानंतर या संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर झाला. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनही बायोबबलच्या समस्येमुळे मायदेशी परतला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात आता फक्त 5 परदेशी खेळाडू शिल्लक राहिले आहेत.

त्यामुळे या संघाच्या संघव्यवस्थापनान आता बदली खेळाडूच्या आधारे संघात नवीन खेळाडूंचा समावेश करण्याचा विचार करत आहे. त्यामध्ये आता या संघात दक्षिण आफ्रिकेचा रस्सी वॅन डर डसेन हा दिग्गज फलंदाज राजस्थान संघात सामील होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. या खेळाडूने आपल्या टी20 ककारकीर्दीत एकूण 20 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने एकूण 628 धावा केल्या आहेत. तर यामध्ये 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाची कामगिरी खूपच खराब झाली असल्याने हा संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या 8 व्या क्रमांकावर आहे. या संघाने यंदाच्या मोसमात चारपैकी एकच सामना जिंकला आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी शेवटच्या दोन सामन्यांत मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना दहा गडी राखून पराभव पत्करावा लागला तर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 45 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

त्याअगोदर दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात त्यांनी या सत्रातील पहिला विजय मिळवला तर या सत्रातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध संघाचा कर्णधार संजू सॅमसनने शतकी खेळी करूनही चार धावांनी पराभवाची चव चाखायला लागली होती. त्यामुळे राजस्थान संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल.

शनिवारी (२४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध असून यामध्ये राजस्थानचा संघ विजयी होऊन पुनरागमन करण्यास उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

युवराजने सचिनला दिल्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा, शेअर केला हृदयस्पर्शी क्षणांचा खास व्हिडिओ

कोरोनाचा हाहाकार! ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ची भारतासाठी प्रार्थना; मोदींकडून परिस्थिती चांगली हाताळण्याची अपेक्षा

…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---