---Advertisement---

VIDEO | पोज देत बसला आफ्रिकी फलंदाज, स्टार्कने घातक चेंडू टाकून उडवला त्रिफळा

mitchell starc
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजेचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात आफ्रिकी संघाचे दोन फलंदाज स्टार्कचे शिकार बनले. दुसऱ्या डावात त्याने रस्सी वॅन डर ड्यूसेन याला ज्या पद्धतीने त्रिफळाचीत केले, तो क्षण पाहण्यासारखा होता. 

उभय संघांतील या सामन्यात मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याच्या वाट्याला एकूण पाच विकेट्स आल्या. त्याने पहिल्या डावात 41 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 26 धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. दुसऱ्या डावात त्याने रस्सी वॅन डर ड्यूसेन (Rassie van der Dussen) याला बाद केले आणि कसोटी कारकिर्दीतील 300 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने हा विक्रम करण्यासाठी त्याचे कौतुक कमी, पण ड्यूसेनची विकेट घेण्यासाठी त्याचे अधिक कौतुक केले जात आहे.

स्टार्कने टाकलेला हा चेंडू जबरदस्त होता, जो थेड स्टंप्समध्ये घुसला. स्ट्रार्कचा या घातक चेंडूवर ड्यूसेनने डिफेंस करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण चेंडू कधी स्टंप्समध्ये गेला, हे त्याला स्वतःला देखील समजले नाही. त्रिफळा उडाल्यानंतर देखील ड्यूसेने काही वेळ त्याच जागेवर उभा होता. विकेट गमावल्याचा त्याला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता, असेच या व्हिडिओतून पाहायला मिळते. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून स्टार्कचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात 152 तर दुसऱ्या डावात अवघ्या 99 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा करून आघाडी घेतली होती आणि शेवटच्या डावात त्यांना विजयासाठी अवघ्या 35 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण हे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाला तब्बल चार विकेट्स गमवाव्या लागल्या. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना होता. विजयानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने 1-0 असी विजयी आघाडी घेतली आहे.  (Rassie Van Der Dussen was clean bowled on Mitchell Starc’s ball)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एसएफए अजिंक्यपद स्पर्धेत पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाला विजेतेपद; जैनम, राजलक्ष्मी यांची लक्षवेधी कामगिरी
असा जाणार भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये, जिंकायचेत फक्त ‘इतके’ सामने 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---