बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी (3 जानेवारी) मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. त्यामध्ये स्टार्सचा कर्णधार ऍडम झम्पा शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू टाकण्याआधी थांबला आणि क्रीझच्या पुढे गेलेल्या टॉम रॉजर्सला (Tom Rogers) धावबाद केले. यावर पंचांनी फलंदाजाला नाबाद दिले, कारण झम्पाने गोलंदाजीची ऍक्शन पूर्ण केली होती. यावर थर्ड अंपायरचाही निर्णय विचारला गेला, तेव्हा त्यांनीही तेच कारण दिले. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये आता आर अश्विन यानेही आपले मत व्यक्त केले आहे.
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने त्याच्या यूट्युब चॅनलवर म्हटले, “मी यावर बोलून आता थकलोय. जेव्हा जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा अनेक प्रचारक आपले सल्ले द्यायला सुरूवात करतात. यामध्ये मला ऍडम झम्पाची एक गोष्ट आवडली. त्याने जेव्हा नॉन-स्ट्रायकरला बाद केले तेव्हा त्याने एक कटाक्ष फलंदाजाकडे टाकला. असे वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनमध्ये अंडरटेकर करतो. त्याने फलंदाजाला एक शब्दही नाही म्हटला. तसेच फलंदाजही शांत होता, त्याला माहितच नव्हते तो बाद होता का नाही.”
“तो फलंदाज बाद होता की नाही, गोलंदाजाने त्याची ऍक्शन पूर्ण केली की नाही अशा चर्चा सुरू होतात. इथे चेंडू टाकला जाणार होता आणि नॉन-स्ट्रायकर पळणार होता. खरे तर, नियम स्पष्ट सांगतो गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा तुम्ही पळू शकता कारण एकदा टाकलेल्या चेंडूनंतर त्याप्रकारे बाद करता येत नाही,” असेही अश्विन पुढे म्हणाला.
अश्विनने हे डेविस हसी (David Hussey) याच्या वक्तव्यावरून म्हटले आहे. हसीने म्हटले होते की, ‘फलंदाजाला बाद केले असते तर अपील परत घेतली असती. क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाज त्याची ऍक्शन पूर्ण करण्याआधी नॉन-स्ट्रायकरला बाद करू शकतो. झम्पाने त्याची गोलंदाजी ऍक्शन पूर्ण केली होती.’ हसी स्टार्सचा प्रशिक्षक आहे.
हसीच्या या विधानावरूनच अश्विन म्हणाला, “अपील परत घेतली तर थर्ड अंपायरकडे जाण्याची आवश्यकता नसती. थर्ड अंपायरकडे जाण्याआधी अपील मागे घेतली पाहिजे होती. सर्वप्रथम अपील मागे का घ्यावी? एक गोलंदाज नॉन-स्ट्रायकरला बाद करत आहे. कर्णधार म्हणेल की गोलंदाजाची चुक आहे हा त्या गोलंदाजाचा किती मोठा अपमान आहे.”
Adam Zampa is a true Rajasthan Royal. pic.twitter.com/D1GIZf6F4U
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2023
हा सामना स्टार्सने 33 धावांनी गमावला. (R Ashwin Slams David Hussey remark on Adam Zampa run-out attempt BBL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रैना-पोलार्ड खेळलेल्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग? आयसीसीने सुरू केला तपास
‘टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यातच राहणार’, स्पर्धा संयोजकांना आत्मविश्वास