कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पार पडली असून बुधवारपासून टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या टी२० मालिकेत ३ सामने खेळवले जाणार आहेत. ही संपूर्ण मालिका ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१६ फेब्रुवारी) पार पडला असून या सामन्यातून युवा फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने पदार्पण केले. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात बिश्नोईने चक्क मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा १६ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
बिश्नोईची शानदार गोलंदाजी
राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रवी बिश्नोईने वयाच्या २१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले. त्याने हा आपला पहिलाच सामना अविस्मरणीय करताना वेस्ट इंडीजच्या धावसंख्येला लगाम घालण्याचे काम केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात अत्यंत कंजूस गोलंदाजी त्याने आपल्या चार षटकात केवळ १७ धावा देऊन रॉवमन पॉवेल व रोस्टन चेस यांना एकाच षटकात तंबूचा रस्ता दाखवला. अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल संघात असतानाही बिश्नोईने त्याच्यापेक्षा सरस कामगिरी करून दाखवली.
मोडला सचिनचा विक्रम
बिश्नोईने त्याच्या ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडला. भारताकडून टी२० सामन्याच्या पदार्पणातील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. (Best Bowling figures by Indian spinner in T20I debut) या विक्रमात माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा ( ४-२१) व अष्टपैलू अक्षर पटेल (३-१७) हे आघाडीवर आहेत. सचिनने २००६ मध्ये टी२० पदार्पणात १२ धावांत १ विकेट घेतली होती. सचिनचा तो पहिला आणि अखेरचा टी२० सामना होता. तो विक्रम आज बिश्नोईने मोडला.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गज म्हणतोय, “सनरायझर्समध्ये विलियम्सन बनणार बळीचा बकरा” (mahasports.in)