भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पुन्हा एकदा समालोचक आणि समीक्षक या आपल्या जुन्या रूपात परतले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. हार्दिक पांड्याच्या निवृत्तीबद्दलही ते बोलले. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त सहा संघांना खेळायची कल्पना त्यांनी मांडली. आता त्यांनी भारतीय संघातील समतोलाविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्री यांनी सध्याच्या भारतीय संघातील समतोलाविषयी एक ठळक विधान केले. सध्या भारतीय संघात रवींद्र जडेजा, दीपक हुडा व अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र, हे सर्वजण सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. सध्याच्या भारतीय संघातील पहिल्या पाच फलंदाजांपैकी कोणीही सहसा गोलंदाजी करताना दिसत नाही. हाच धागा पकडून शास्त्री म्हणाले,
“मला वाटते की सध्याच्या भारतीय संघात सचिन तेंडुलकरसारखा गोलंदाजी करण्याचा किडा कोणातही दिसून येत नाही. सचिन बिंदास चेंडू हातात घ्यायचा आणि ऑफ स्पिन तर कधी लेग स्पिन गोलंदाजी करायचा. अजय जडेजादेखील त्यासारखाच होता. तुमच्याकडे टॉप ऑर्डरमध्ये असे खेळाडू हवेत, जे तुम्हाला पाच-सहा षटके टाकून देतील. मधल्या काळात सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग ती जबाबदारी पार पाडताना दिसले आहेत.”
शास्त्री पुढे बोलताना म्हणाले,
“आता दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांना ही भूमिका बजावताना पाहून आनंद होतो. मात्र, त्यांना देखील पुरेसा पाठिंबा मिळायला हवा. मला वाटते आपली जितकी लोकसंख्या आहे त्यात असे एक-दोन खेळाडू तर नक्कीच भेटतील. कर्णधाराने स्पष्टपणे सांगावे की, देशांतर्गत क्रिकेटमधून तुम्ही मला असे दोन खेळाडू तरी शोधून द्या. जे वरच्या क्रमांकावर फलंदाजीसह थोडीफार गोलंदाजी करू शकतील.”
अलीकडच्या काळात दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अनेक सामन्यांमध्ये भारतासाठी निर्णय भूमिका बजावत, संघाच्या विजयात योगदान दिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग