भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अमोल मुझूमदारला भारतीय संघात न घेतल्याने भारतीय संघाचे नुकसान झाल्याचे भाष्य केले आहे.
एक ट्विट करत शास्त्री यांनी अमोलबरोबरचा फोटो शेअर केला आहे. शास्त्री म्हणतात, रणजी ट्राॅफीमधील एका दिग्गज खेळाडूबरोबरचा हा फोटो. मी जेव्हा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम खेळत होतो, तेव्हा तो पहिला हंगाम खेळत होता. आजही वाटते, अमोलला कसोटीत संधी न दिल्यामुळे भारताचे नुकसान झाले आहे.
With one of #RanjiTrophy giants – @amolmuzumdar11. My last season was his first. I still believe it was #TeamIndia’s loss to not see him in whites. #GentleGiant #Mumbai @MumbaiCricAssoc pic.twitter.com/vf5IAHd6Ol
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) May 22, 2020
१९९३ -९४ च्या मोसमात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मुजुमदारने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १७१ सामन्यात ३० शतके आणि ६० अर्धशतकांसह ४८.१३ च्या सरासरीने १११६७ धावा केल्या आहेत. सध्या मुजुमदार आयपीएलमधील राजस्थान रॉसल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पहात आहे.