सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. दरम्यान तिथे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) समालोचकाची भूमिका बजावत आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शास्त्रींनी माजी क्रिकेटपटू नारी काँट्रॅक्टर यांच्या निधनाची बातमी पोस्ट केली. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने पसरली. पण ही बातमी काही वेळानंतर खोटी ठरली.
शास्त्रींनी ही बातमी खोटी असल्यामळे माफी मागितली. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नारी काँट्रॅक्टरच्या तब्येतीची माहिती दिली आहे. शास्त्री यांनी लिहिले की, “नारी काँट्रॅक्टरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. तो पूर्णपणे निरोगी आहे.” नारी काँट्रॅक्टरने 1955 मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर न्यूझीलंडविरूद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती.
Apologies – the news floating around the demise of Nari Contractor is incorrect. He is fine. God bless 🙏 pic.twitter.com/zGqWjim9SL
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) November 2, 2024
भारतीय क्रिकेट संघ 1962 साली वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ बार्बाडोसविरूद्ध सराव सामना खेळला, त्याच सामन्यात भारताच्या नारी काँट्रॅक्टरच्या डोक्याला मार लागला. चार्ली ग्रिफिथच्या चेंडूचा जोरदार फटका बसल्याने नारी काँट्रॅक्टर 6 दिवस बेशुद्ध पडला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी वेस्ट इंडिजचे फ्रँक वॉरेल, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, पॉली उमरीगर आणि पत्रकार के.एन. प्रभू यांनी रक्तदान केले होते, त्यावेळी त्याचा जीव वाचला होता.
नारी काँट्रॅक्टरच्या (Nari Contractor) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले. दरम्यान त्याने 52 डावात फलंदाजी करताना 31.58च्या सरासरीने 1,611 धावा केल्या. कसोटीमध्ये त्याने 11 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लिश फलंदाजानं घेतला स्टुअर्ट ब्रॉडचा बदला! भारतीय खेळाडूच्या 6 चेंडूवर ठोकले 6 षटकार
सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?
शुबमन गिलनं मोडला पुजाराचा मोठा रेकॉर्ड, रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री