---Advertisement---

नागपूर कसोटीसाठी शास्त्री गुरुजींनी केली ‘त्या’ खेळाडूची शिफारस; म्हणाले, ‘तो सर्वात वेगळा…”

On: मंगळवार, फेब्रुवारी 7, 2023 4:35 PM
WTC Final India Team
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) प्रवेश करू शकतो. या मालिकेत भारतीय संघाचे मदार प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांवर असेल. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पहिल्या कसोटी पासूनच चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी देण्याचा सल्ला दिला आहे.

या प्रतिष्ठित कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात चार दर्जेदार फिरकीपटू सामील आहेत. अनुभवी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यासह अक्षर पटेल व कुलदीप यादव गोलंदाजी विभाग सक्षम बनवतील. जडेजा पूर्ण तंदुरुस्त असल्यास त्याची संघातील जागा नक्की मानली जातेय. तर, अश्विन हा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असेल. तिसऱ्या फिरकीपटूसाठी अक्षर व कुलदीप यांच्यात चुरस रंगेल. त्याच मुद्द्यावर आपले मत देताना शास्त्री म्हणाले,

“कुलदीप यादव हा पहिल्या कसोटीपासूनच संघात असायला हवा. तो या तिघांपेक्षा वेगळी कौशल्य घेऊन येतो. भारताला नाणेफेक गमवावी लागली आणि पहिल्या दिवसापासून गोलंदाजी करण्याची गरज पडल्यास, तो सर्वाधिक उपयुक्त ठरेल.”

कुलदीप हा डावखुऱ्या हाताचा लेगस्पिनर म्हणजेच चायनामन गोलंदाज आहे. असे गोलंदाज अगदी दुर्मिळरित्या पाहायला मिळतात. यापूर्वी देखील भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व माजी निवडसमिती सदस्य सुनील जोशी यांनी कुलदीप याला संघात स्थान मिळायलाच हवे असे म्हटलेले.‌ कुलदीप याने मोठ्या काळानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघासाठी पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्यामुळे कसोटी संघातही त्याचा फायदा होईल, असे अनेक दिग्गजांना वाटते.

(Ravi Shastri Backs Kuldeep Yadav For Nagpur Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---