---Advertisement---

मोठी बातमी! रवी शास्त्रींपाठोपाठ टीम इंडियाचे ‘हे’ महत्त्वाचे सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चालू झाला आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

खरंतर रविवारी सामन्याचा चौथा दिवस सुरु होण्याच्या काही वेळापूर्वी बीसीसीआयने माहिती दिली होती की रवी शास्त्री यांच्यासह भारत अरुण, आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. शास्त्री यांची शनिवारी लॅटरल फ्लो टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर शास्त्री आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या भारत अरुण, आर श्रीधर आणि नितीन पटेल यांना संघापासून वेगळे करण्यात आले होते.

यानंतर भारतीय संघातील अन्य सर्वांची शनिवारी आणि रविवारी सकाळी लॅटरल फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यात अन्य सदस्य निगेटिव्ह आढळले होते. त्यामुळे ओव्हल कसोटीचा चौथा दिवस रविवारी नियमित वेळेत सुरु झाला.

पण, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार क्वारंटाईन करण्यात आलेल्या सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली असून त्यात शास्त्रींसह भारत अरुण आणि आर श्रीधर यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता या तिघांनाही अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. तसेच जोपर्यंत त्यांचे २ अहवाल निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना भारतीय संघात सामील होता येणार नाही. त्यामुळे ते भारत आणि इंग्लंड संघातील ५ व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला देखील मुकतील.

इंग्लंड विरुद्ध भारत संघातील ५ वा कसोटी सामना मँचेस्टर येथे १० ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

फॉर्मात परतण्यासाठी सेहवागचा रहाणेला रामबाण उपाय; म्हणाला, ‘आई-वडिलांसाठी मैदानावर…’

भारतीय संघाला धक्का! शेवटच्या कसोटीतून रवी शास्त्री बाहेर, मोठे कारण आले समोर

टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात मोठा फेरबदल, मुख्य प्रशिक्षक मिसबाहसह गोलंदाजी कोचचाही राजीनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---