Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत माझा आणि विराटचा सहभाग नव्हताच’, शास्त्रींचा धक्कादायक खुलासा

November 13, 2021
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-Ravi-Shastri

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी करत स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला होता. पण आता भारतीय संघाचे प्रयत्न कमी पडले आणि भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला. भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे.

आता विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघ निवडीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. रवी शास्त्री यांनी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘विश्वचषक संघाच्या निवडीत माझी कोणतीही भूमिका नव्हती.’ रवी शास्त्रींच्या म्हणण्यानुसार ते संघ निवडीत सहभागी नव्हते. तथापि, प्लेइंग इलेव्हन निवडण्यात त्यांनी निश्चितपणे भूमिका बजावली. रवी शास्त्री यांनी असेही सांगितले की, निवडकर्त्यांनी टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघासाठी विराट कोहलीचा सल्लाही घेतला नव्हता.

टी-२० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. २००७ मध्ये भारतीय संघाने चषक जिंकला होता. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यासाठी हा टी-२० विश्वचषक खूप खास होता. एकीकडे विराट कोहली कर्णधार म्हणून शेवटचा टी-२० विश्वचषक खेळत होता. तर दुसरीकडे, रवी शास्त्री शेवटच्या वेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार होते.

परंतु हा विश्वचषक भारतासाठी खूप खराब राहिला आहे. भारतीय संघाने सुपर-१२ मधील पहिले दोन सामने गमावले. पाकिस्तानने भारतीय संघाला १० गड्यांनी हरवले, त्यानंतर न्यूझीलंडने ८ गडी राखून पराभव केला. इथून भारतीय संघ अडचणीत आला होता. भारताने शेवटचे तीन सामने लक्षणीय फरकाने जिंकले, पण त्यांना गुणतालिकेत आपल्या पुढे असलेल्या न्यूझीलंडला मागे टाकता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा तुटणार विलियम्सन आणि संघाचे स्वप्न? ‘अशी’ राहिलीय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडची आमने सामने कामगिरी

टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी

Video: वॉर्नरची पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमधील ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली असती भलतीच महागात


Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

टी२० विश्वचषकानंतर पुन्हा भिडणार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ, 'या' दिग्गजांना मिळू शकते विश्रांती

Photo Courtesy: Twitter/@BCCIwomen

कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकटेचा समावेश, भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने सामने; पाहा वेळापत्रक

Photo Courtesy: Twitter/ BCCI

...म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143