---Advertisement---

नितीश रेड्डीच्या शतकानंतर रवी शास्त्रींना अश्रू आवरेना, कॉमेंट्री बॉक्समधील भावनिक फोटो समोर

---Advertisement---

मेलबर्न कसोटी सामन्यात युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीनं टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावलं. त्यानं कठीण काळात भारताचा डाव सांभाळला आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत जबरदस्त भागीदारी केली. नितीश रेड्डी यानं आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत हे शतक झळकावलं. त्याच्या शतकानंतर सगळेच भावूक झाले होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी भावूक झाले. या क्षणाचा एक फोटो समोर आला आहे.

21 वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डी यानं मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. यावेळी त्याचं कुटुंबही स्टेडियममध्ये उपस्थित होतं. नितीशनं शतक झळकावल्यानंतर त्याचे वडील खूप भावूक झाले होते. हे पाहून प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावले.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. कॉमेंट्री बॉक्समधील त्यांचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. नितीश रेड्डी याच्या शतकी खेळीनंतर रवी शास्त्री कसे भावूक झाले याचा फोटो तुम्ही येथे पाहू शकता.

 

नितीश रेड्डी याच्या शतकानंतर कुटुंबीयांनी त्याची भेट घेतली. यावेळी सर्वांचे डोळे ओलावले होते. बीसीसीआयनं नितीश रेड्डी याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाला भेटत आहे. हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर तो प्रथम त्याच्या आईला भेटतो. नितीशला पाहताच त्याची आई आनंदानं त्याच्या गालाचं चुंबन घेते. यानंतर तो आपल्या बहिणीला मिठी मारतो. रेड्डी याच्या वडिलांनाही आपले अश्रू आवरता येत नाहीत आणि ते आपल्या मुलाच्या खांद्यावर डोके ठेवून भावूक होतात.

हेही वाचा – 

नितीश कुमार रेड्डीवर पैशांचा वर्षाव, शतक झळकावताच मिळालं मोठं बक्षीस
सामन्यानंतर नितीश रेड्डी कुटुंबासोबत, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
अर्धशतकास पुष्पा तर शतकास बाहुबली! शतकानंतर नितीश रेड्डीचे हटके सेलिब्रेशन, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---