भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. गुरुवारी (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये उभय संघांतील तिसरा कसोटी सामना सुरू झाला. सरफराज खान याला अखेर या सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्याचे वडील आणि पत्नी सरफराजला कसोटी कॅफ मिळताना मैदानात उपस्थित होते. पण सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून मोठी चूक झाली.
सरफराज खान मागच्या काही हंगामांपासून धावांचा अक्षरशः पाऊस पाडताना दिसला. गुरुवारी कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाकडून त्याला अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या मुलाला कसोटी पदार्पण करताना पाहून सरफराजच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. दुसरीकडे त्याची पत्नी रोमाना हिदेखील भावूक झाली होती. हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण अशातच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
शास्त्री सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. राजकोट कसोटीच्या
पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी शास्त्रींकडून सरफराजच्या पत्नीचा उत्नीचा उल्लेख आई असा झाला. सोशल मीडियावर शास्त्रींच्या या विधानाची चांगलाची चर्चा झाली. अनेकजण माजी भारतीय दिग्गजावर टीका करताना दिसत आहेत.
PEAK ravi shastri headline. pic.twitter.com/3PsH96j3Yo
— Sahil (@sahil_abruk) February 16, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ 238 धावांच्या आघाडीवर आहे. पहिल्या डावात भारताने 445 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 2 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारतासाठी रोहित शर्मा (131) आणि रविंद्र जडेजा (112) यांनी शतके ठोकली. तर दुसरीकडे इंग्लंडसाठी सलामीवीर बेन डकेट याने नाबाद 133 धावा केल्या आहेत. (Ravi Shastri has said that the sentiments of Sarfaraz Khan’s family will be hurt)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
Ravichandran Ashwin । 500 कसोटी विकेट्ससाठी कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडूनेही केलं अश्विनचं कौतुक, पाहा व्हिडिओ
IND vs ENG । अश्विनची 500वी विकेट वडिलांसाठी समर्पित! भारताचा महान गोलंदाज काय म्हणाला पाहाच