जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. याबाबत, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाला मोठा सल्ला दिला आहे. शास्त्री म्हणतात की रिप्लेसमेंट शोधण्यासाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीची वाट पाहू नये. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि कर्णधार रोहीत शर्मा हे तिघेही वयाच्या तिशीत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी भारताला लवकरच खेळाडूंची गरज भासेल.
या खेळाडूंसाठी रिप्लेसमेंट शोधण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करावी. शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे उदाहरण दिले तसेच, शास्त्री म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाने एक योजना कायम ठेवली आहे. त्यांच्याकडे कॉलिटी रिप्लेसमेंट तयार आहेत जे आवश्यक असल्यास वापरले जातात.”
रवी शास्त्रींचा भारतीय संघाला सल्ला
माध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले, “हेच थिंक टँक आणि निवडकर्त्यांना बसून सर्व काही पहावे लागेल. योजना बनवावी लागेल आणि संघ कसा तयार करायचा याची झलक दाखवावी लागेल.” पुढे म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षांपासून हे केले आहे. पुढच्या तीन वर्षात त्यांना कुठे पोहोचायचे आहे हे ते सातत्याने पाहत आहेत. तुमचे पाच खेळाडू अचानक निवृत्त होण्याची वाट ते पाहत नाहीत.”
शास्त्री म्हणाले की, “युवा खेळाडूंच्या आगमनामुळे संघाची वाढ होईल कारण सतत नवनवीन कल्पना येत राहतील आणि त्याचवेळी अनुभवी खेळाडूही युवा खेळाडूंना आपले ज्ञान देऊ शकतील.”
शास्त्री म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया सातत्याने युवे खेळाडू आणत आहेत. त्यामुळे त्याच्या संघात नेहमीच युवा खेळाडू आणि अनुभव यांचा मिलाफ असतो. वरिष्ठ खेळाडूंसोबत युवा खेळाडू लवकर शिकत असतात. त्यामुळे तुमचा संघ नेहमीच मजबूत राहतो आणि खेळाडूंमध्ये निरोगी नाते असते. या सर्व कारणांमुळे नियोजन करावे लागेल. त्या साठीच कठीण निर्णय घ्यावे लागतील. लोकांना हे आवडणार नाही पण संघाच्या हिताच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून त्याकडे पाहायला हवे.”
भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही भविष्याबद्दल बोलला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे अनेक युवा खेळाडू आहेत, हे त्याने मान्य केले.
यावेळी रोहित म्हणाला की, “आम्ही सर्व स्पर्धा खेळतो, पुढे जाण्यासाठी तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करू शकता हे आम्हाला पाहावे लागेल. खरे सांगायचे तर सामना आता संपला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला काय करायचे आहे याचा विचार अजून केलेला नाहीये. नक्कीच, अशा काही गोष्टी असतील जिथे आपण काय केले जाऊ शकते आणि काय करणे चांगले आहे ते पाहू शकतो.”
महत्वाच्या बातम्या –
भारीच! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करणार एमपीएलच्या उद्धाटन सोहळ्यात लाईव्ह परफॅार्म
KL Rahul । भारतीय संघाची चिंता दूर! प्रमुख स्पर्धेआधी सलामीवीर संघात परतण्याची पूर्ण शक्यता