महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघात वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम लढतीत भारतीय संघाने बाजी मारत इंग्लंड संघाला ७ धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्यांनी आपला आनंद ट्विट करत व्यक्त केला आहे यासोबतच त्यांनी चाहत्यांचे मन देखील जिंकले आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाला ५० षटक अखेर ३२२ धावा करता आल्या. इंग्लिश संघाकडून सॅम करन याने एकहाती झुंज देत सर्वाधिक ९५ धावा केल्या. हा सामना भारतीय संघाने ७ धावांनी आपल्या नावावर केला. या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विट करत संघाचे कौतुक केले आहे.
त्यांनी ट्विट करत लिहिले की, “भारतीय संघातील सर्व खेळाडूंना या कठिण परिस्थितीतही सीजन ऑफ लाईफटाईम गाजवल्यामुळे खूप खूप शुभेच्छा. क्रिकेटच्या सर्व प्रकारात जगातील २ बलाढ्य संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन, भारतीय संघाला माझे अभिवादन.”
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1376231541404229635?s=20
रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळल्यापासून भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. नुकतेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली होती.
तसेच इंग्लंड संघाविरुद्ध देखील कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला होता. नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत देखील भारतीय संघाने २-१ ने इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजिंक्यचं देशप्रेम! तिरंग्यावर ऑटोग्राफ देण्यास रहाणेचा नकार, आयपीएस अधिकाऱ्याने केलं कौतुक
INDvENG: विराट, रोहित आणि रिषभमध्ये धावांसाठी जबरदस्त चढाओढ, अखेर ‘हा’ फलंदाज ठरला अव्वल
सातासमुद्रापार रिषभ पंतच्या ‘रिव्हर्स स्कूप’चा जलवा; व्हिडिओ पाहून म्हणाल, सेम टू सेम!