---Advertisement---

टी२० विश्वचषकात रथी-महारथी प्रशिक्षकांना भारतीय म्हणून एकटे शास्त्री गुरुजीच देणार टक्कर

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 5:07 PM
ravi-shastri
---Advertisement---

पुढील महिन्यापासून टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. विश्वचषक संघाची घोषणा झाल्यानंतर प्रशिक्षक मिसबाह-उल-हक याने राजीनामा दिला होता. विश्वचषकात एकूण १६ संघ उतरत आहेत. यापैकी ७ संघांचे प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गजही वेगवेगळ्या संघांना मार्गदर्शन करताना दिसतील. भारताबद्दल बोलायचे झाले तर फक्त रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून उतरत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांचा बोलबाला
दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचर याची राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लान्स क्लुझनर अफगाणिस्तानचा, रसेल डोमिंगो बांगलादेशचे, ग्रॅहम फोर्ड आयर्लंडचे, पियर डी ब्रुयने नामिबियाचे, शेन बर्गर स्कॉटलंडचे आणि मिकी आर्थर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक असतील. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांबाबतीत बोलायचे झाल्यास मॅथ्यू हेडन व्यतिरिक्त, जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियाचे तर, रायन कॅम्पबेल नेदरलँडचे प्रशिक्षक आहेत. इंग्लंडचे प्रशिक्षक इंग्लंडचेच ख्रिस सिल्व्हरवूड, न्यूझीलंडचे प्रशिक्षक न्यूझीलंडचेच गॅरी स्टीड असतील. ओमानचे प्रशिक्षक श्रीलंकेचे दिलीप मेंडिस, पापुआ न्यू गिनीचे प्रशिक्षक इटलीचे कार्ल सेंद्री आणि वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक वेस्ट इंडिजचेच फिल सिमन्स आहेत.

प्रशिक्षक म्हणून शास्त्रींना मोठा अनुभव
प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. ते २०१७ पासून भारतीय संघाशी जोडले गेले आहेत. यापूर्वी, त्यांनी २०१५-२०१६ मध्ये देखील संघासोबत काम केले होते. या काळात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना, वनडे विश्वचषकात उपांत्य फेरी आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केलेली दिसून येते.

भारताने २००७ मध्ये लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनात टी२० विश्वचषक, २०११ मध्ये गॅरी कर्स्टनच्या प्रशिक्षण कालावधीत वनडे विश्वचषक आणि २०१३ डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. २०१३ नंतर भारतीय संघाने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. आपल्या अखेरच्या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी शास्त्री प्रयत्नशील असतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---