---Advertisement---

“काही लोकांना मी मुख्य प्रशिक्षक म्हणून नको होतो”; शास्त्री गुरूजींनी फोडला आणखी एक बॉम्ब

On: शनिवार, डिसेंबर 11, 2021 12:42 AM
ravi-shastri
---Advertisement---

भारतीय संघाला काही दिवसांपूर्वी पार पडलेलल्या टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या रूपात नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाले. रवी शास्त्री (ravi shastri) यांचा संघासोबचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपला. त्यांनी पुन्हा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. शास्त्री २०१७ पासून संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांच्या कार्यकाळात संघाने अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले. असे असले तरी प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात शास्त्रींना देखील अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. अशात एका अडथळ्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

शास्त्रींनी २०१७ मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती केली गेली होती. शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांदा नियुक्ती दरम्यान काही लोकची इच्छा होती की, त्यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक होऊ नये. या लोकांनी शास्त्रींनी प्रशिक्षक होऊ नये यासाठी खूप प्रयत्न देखील केले होते.

एका मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले की, “माझ्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान मी एका मोठ्या विवादात अडकलो होतो. काही लोक मला मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त करू इच्छित होते.” शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे काही लोक भरत अरूण यांना देखील संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी करू इच्छित नव्हते.

“होय, ते मला भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षकाच्या रुपात देखील देऊ इच्छित नव्हते आणि आज जेव्हा मी मागे पाहतो, तेव्हा वाटते की गोष्टी बदलल्या आहेत. त्यांना जे गोलंदाजी प्रशिक्षकाच्या रूपात नको होते. त्यांची भूमिका अप्रतिम राहिली आहे. मी लोकांवर बोट दाखवत नाहीय, परंतु काही खास लोक होते. मी नक्कीच म्हणेल की, त्यांनी पूर्ण प्रयत्न केले की, मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू नये. पण हेच आयुष्य आहे,” असे शास्त्रींनी पुढे बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

मॅक्लनघनची भारतीय संघावर जहरी टीका; चाहत्यांनी दिले सडेतोड उत्तर

वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”

ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---