भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या आयपीएल 2023 मध्ये समालोचन करताना दिसत आहेत. यादरम्यान ते आपले परखड मत व्यक्त देखील करत असतात. नुकतीच त्यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी काही असे खुलासा केले आहेत, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप येऊ शकतो.
रवी शास्त्री हे जवळपास सात वर्ष भारतीय संघासोबत कार्यरत होते. त्यांनी आधी दोन वर्ष भारतीय संघाचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळलेला. त्यानंतर 2017 ते 2021 या कार्यकाळात ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले. आपल्या याच कारकीर्दी दरम्यानची काही गुपिते त्यांनी नुकतीच सांगितली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“मी भारतीय संघासोबत सात वर्ष होतो. त्यावेळी मी निवड समितीच्या बैठकीला जात नसत. विशेष म्हणजे मला बोलावण्यात आले नव्हते. मात्र, नंतरच्या काळात तिथे असे काही लोक येत ज्यांना बीसीसीआयच्या नियमानुसार येण्याची परवानगी नव्हती.”
त्यांच्या या विधानाचा रोख बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. गांगुली सध्या या पदावरून पायउतार झाले असले तरी, ते आपल्या काळात निवड समितीवर वर्चस्व गाजवायचे असे आरोप झाले होते. तसेच बीसीसीआय सचिव जय शहा देखील निवड समितीच्या बैठकांना उपस्थित असतात असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आलेला.
याच मुलाखतीत शास्त्री यांनी विराट कोहलीला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीकडे नेतृत्व देण्याची गोष्ट म्हटलेली. रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास त्याच्या जागी विराट योग्य उमेदवार असेल असे त्यांनी म्हटले होते.
(Ravi Shastri Said Some People Attend Selection Committee Meeting It’s Against BCCI Constitution)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: सूर्याची दर्जा खेळी संपवताना संदीपने टिपला ‘कॅच ऑफ द सिझन’, झाली कपिल पाजींची आठवण
पराभवांनी हलले राजस्थान-सीएसकेचे सिंहासन! मुंबईची मुसंडी मारण्यास सुरुवात, अशी आहे गुणतालिका