भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसं पाहिलं तर सध्याच्या भारतीय संघाला मजबूत संघ मानतात. तसेच त्यांनी असेदेखील म्हटले होते की, परदेशी दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करणारा हा पहिलाच भारतीय संघ आहे.
परंतु आता शास्त्रींनी (Ravi Shastri) म्हटले की, १९८५मध्ये वनडे सामने खेळणारा भारतीय संघ इतका मजबूत होता की, तो विराटच्या नेतृत्वातील सध्याच्या भारतीय संघालाही भारी ठरला असता.
शास्त्रीही १९८५मधील सुनील गावस्करांच्या (Sunil Gavaskar) नेतृत्त्वातील भारतीय संघाचा भाग होते. त्यांनी त्यावेळी क्रिकेट जागतिक चॅम्पियनशीपचे विजेतेपद मिळवले होते. शास्त्री ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या या चॅम्पियनशीपचे हिरो होते. तसेच त्यांना या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू निवडण्यामुळे प्रसिद्ध असलेला ‘ऑडी’कारदेखील मिळाली होती.
शास्त्री सध्याही भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
शास्त्रींनी सोनी टेन पिटस्टॉपच्या कार्यक्रमादरम्यान म्हटले की, “यामध्ये कोणतीही शंका नाही. १९८५मधील वनडे संघ आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय संघाला आव्हान देऊ शकते. इतकेच नव्हे तर तो भारतीय संघ सध्याच्या भारतीय संघालाही चिंतेत टाकू शकतो.”
शास्त्रींच्या मते, १९८५ मधील भारतीय संघ १९८३मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघापेक्षा चांगला होता. कारण त्यामध्ये युवापणाचे आणि अनुभवाचे चांगले मिश्रण होते. ते पुढे म्हणाले की, “मी तर इथपर्यंत म्हणेल की, १९८३च्या संघाच्या तुलनेत १९८५मधील भारतीय संघ अधिक मजबूत होता.”
शास्त्री म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे की, मी त्या दोन्हीही संघाचा भाग होतो. मी १९८३विश्वचषकामध्ये खेळलो होतो. तसेच १९८५मध्ये भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूकडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर, त्या संघात १९८३ च्या ८० टक्के खेळाडूंचा समावेश होता. परंतु यादरम्यान संघात शिवरामकृष्णन, सदानंद विश्वनाथ आणि अझरूद्दीन यांसारखे युवा खेळाडू आले होते. आमच्याकडे पहिल्यापेक्षा सर्वात अनुभवी खेळाडू होते. तसेच यांचा समावेश झाल्यामुळे संघ आणखी मजबूत झाला होता.”
“ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-१९मध्ये ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकणे हे विशेष होते. परंतु जेव्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटबद्दल चर्चा होते, तेव्हा १९८५मधील भारतीय संघाची गोष्टच वेगळी असते. या दोन्ही संघाचा भाग होणे अप्रतिम आहे. ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करणे खूप कठीण होते. कारण मागील ७१ वर्षांपासून कोणत्याही आशियाई संघाला असा कारनामा करता आला नव्हता,” असेही शास्त्री पुढे म्हणाले.
यादरम्यान शास्त्रींनी १९८५मध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी संघाच्या बैठकीदरम्यानचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “कपिल देव (Kapil Dev) म्हणाले होते की, जर मी कार गाडी जिंकलो तर, त्यातील २५ टक्के (कार विकल्यानंतर मिळणारी रक्कम) भाग मी ठेवेल. तसेच उर्वरित रक्कम वाटेल. यानंतर जिम्मी म्हणजेच मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) म्हणाले की, ‘मित्रांनो, मिळेल त्याला मिळेल.’ पुढे मी म्हणालो की, जर मी कार जिंकलो तर माझ्याकडेच ठेवणार. मी केवळ माझी स्टेपनीच वाटू शकतो.”
१९८५मध्ये ऑस्ट्रेलियात खेळलेला भारताचा वनडे संघ-
के श्रीकांत, मोहम्मद अझरुद्दीन, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, सुनिल गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, सदानंद विश्वनाथ, राॅजर बिन्नी, मदन लाल, चेतन शर्मा, एल शिवरामाकृष्णन
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताकडून खेळला केवळ ३ वनडे, आज आहे एका राज्याचा क्रीडामंत्री
-केकेआरसह या तीन क्रिकेट टीमचा किंग खान होणार मालक
-७०० विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो, रोहितला गोलंदाजी; नको रे बाबा