मुंबई | कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकले होते. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरी, अलिबागजवळ धडकले.
अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी १२०-१४० किलोमीटर इतका होता. वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. वारा आणि पावसाने जोर पकडल्याने घरांची छपरे उडून गेली आहेत. गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या निसर्ग नावाच्या चक्रीवादळाचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शेअर केला आहे. निसर्गाचे रौद्ररूप पाहून रवी शास्त्री चांगलेच हैराण झाले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ” या सारखे महाभंयकर दृश्य यापूर्वी मी कधीच पाहिले नाही. वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता.” भयानक.!
रवी शास्त्री यांचा व्हिडिओ पाहून असे वाटते की, त्यांनी हा व्हिडिओ स्वतः बनविला आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार रवी शास्री अलिबागमध्ये आहेत. अलिबाग येथे रवी शास्त्रीचे फार्महाऊस आहे. ते लाॅकडाऊन दरम्यान तिकडे गेले होते.
Never experienced anything like this. In the eye of the storm #CycloneNisarga
Wind speed close to 100 km/hr. Ferocious #CycloneUpdate #Alibaug #Mumbai #NisargaCyclone pic.twitter.com/LsqZBoOgjx
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील सर्व विमानसेवा रद्द करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद करण्यात आले आहेत तर रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या वादळाचा प्रभाव रात्रीपर्यंत कमी होऊ शकतो.