---Advertisement---

भारतीय संघाला धक्का! शेवटच्या कसोटीतून रवी शास्त्री बाहेर, मोठे कारण आले समोर

On: सोमवार, सप्टेंबर 6, 2021 3:15 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. हा सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचला आहे. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी (६ सप्टेंबर) २९१ धावांची आवश्यकता आहे. तर भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या १० फलंदाजांना बाद करायचे आहे.हा सामना झाल्यानंतर पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर ) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. ज्यामुळे आगामी पाचव्या कसोटी सामन्यात रवी शास्त्री खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये उपलब्ध नसणार आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना १४ दिवसांकरिता विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान २ चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर ते संघासोबत जोडले जाणार आहेत.

तर झाले असे की, शनिवारी रवी शास्त्री यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांची लॅटेरल फ्लो टेस्ट घेतली. दरम्यान ते पॉसिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी घेत रवी शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजीयोथेरपिस्ट नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले.

माध्यमांतील वृत्तानुसार यानंतर शास्त्री यांची आरटी – पीसीआर चाचणी घेण्यात आली असून ती देखील पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना आता विलगिकरणात रहावे लागणार आहे. जो पर्यंत बीसीसीआयचे वैद्यकीय पथक पुष्टी करून ते निगेटीव्ह असल्याची खात्री पटवून देत नाही, तोपर्यंत त्यांना खेळाडूंसोबत प्रवास करण्याची अनुमती दिली जाणार नाही. त्यामुळे ते पाचव्या कसोटीदरम्यान भारतीय संघासह नसतील.

या मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर १० ते १४ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. तसेच भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात मोठा फेरबदल, मुख्य प्रशिक्षक मिसबाहसह गोलंदाजी कोचचाही राजीनामा

भारतीय शिलेदारांच्या ‘सांघिक कामगिरी’मुळे इंग्लंडचा विजयपथ कठीण, नोंदवला अद्भुत विक्रम

लढवय्या शिलेदार…! जखमा घेऊन रोहितची शतकी झुंज, पाहा त्याच्या वेदनांची जाण करुन देणारे फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---