Loading...

दुसऱ्या कसोटीतील ‘सामनावीर’ हनुमा विहारीला रवी शास्त्रींनी दिला होता हा सल्ला

सोमवारी(30 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हनुमा विहारी सामनावीर ठरला.

त्याने या संपूर्ण मालिकेत 4 डावात 93.33 च्या सरासरीने 289 धावा केल्या. या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात 111 धावांची शतकी तर दुसऱ्या डावात नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने त्याच्या या यशाचे श्रेय भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले आहे.

विहारी म्हणाला, ‘शास्त्रींनी मला माझ्या गुडघ्यामध्ये थोडे वळून खेळण्यास सांगितले. ज्यामुळे मला पुढे आणि मागे पाय घेताना सोपे जाईल. या सल्ल्याचा मला उपयोग झाला. त्यामुळे त्यांना श्रेय जाते.’

तसेच विहारी म्हणाला, ‘मला दबावात फलंदाजी करायला आवडते. कारण तूम्हाला फलंदाज म्हणून आव्हान असते आणि अशी परिस्थिती माझ्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येण्यास मदत करते.

याबरोबरच विहारीने अजिंक्य रहाणेबरोबर केलेल्या भागीदारीचे कौतुक केले आहे. तसेच रहाणेने चांगली फलंदाजी केली असल्याचे त्याने म्हटले आहे. रहाणे आणि विहारीमध्ये दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात पाचव्या विकेटसाठी नाबाद 111 धावांची भागीदारी झाली होती.

Loading...

भारताकडून आत्तापर्यंत 6 कसोटी सामने खेळलेला विहारी म्हणाला 9 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही महत्त्वाचा ठरला. त्यामुळे दबावाच्या परिस्थित खेळताना त्याला मदत झाली.

विहारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 75 सामन्यात 60.30 च्या सरासरीने 6272 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 19 शतकांचा आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना 26 विकेट्सही घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

हा खेळाडू म्हणतो, स्टोक्समुळे माझी रात्रीची झोप उडाली

आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ

चौथ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ; स्मिथचे झाले पुनरागमन

Loading...
You might also like
Loading...