---Advertisement---

शास्त्री गुरूजी म्हणतायेत,”विराट आणखी दोन वर्षे नेतृत्व करू शकला असता”

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 2:11 AM
kohli-shastri
---Advertisement---

विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद अचानक सोडल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. चाहते त्याच्या या निर्णयानंतर खूपच निराश झाल्याचे पाहायला मिळाले. तर क्रिकेटमधील दिग्गजांना त्याच्या निर्णयानंतर धक्का बसला होता. अनेक दिग्गजांनी विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. आता या यादीत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) जोडले गेले आहेत. शास्त्रींनी यावेळी रोहित शर्मा (rohit sharma) विषयी देखील महत्वाचे विधान केले.

शास्त्रींच्या मते, विराट अजून काही वर्ष कसोटी संघाचे नेतृत्व करू शकत होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, विराट अजूनही २ वर्ष कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळू शकत होता. शास्त्रींच्या मते, “भारतीय संघ आता पुढच्या बऱ्याच काळापर्यंत मायदेशात खेळेल आणि अशात विराट कोहली स्वतःच्या नावावर ५०-६० कसोटी विजय नोंदवू शकत होता. दरम्यान, विराट भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ४० कसोटी समान्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने विराटच्याच नेतृत्वात केली.”

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी घेण्यासाठी रोहित शर्मा शर्यतीत सर्वात पुढे आहे. याविषयी शास्त्री म्हणाले की, “रोहित फिट असेल, तर तो नक्कीच कर्णधार बनू शकतो. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी कसोटी संघाचा रोहितला उपकर्णधार बनवले गेले होते. अशात तो आता कसोटी संघाचा कर्णधार का बनणार नाही ?” असा प्रश्न शास्त्रींनी उपस्थित केला.

दरम्यान, मागच्या वर्षी टी२० विश्वचषक संपल्यानंतर शास्त्रींनी भारताचे प्रशिक्षकपद सोडले. त्यांचा संघासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघात खूप काही बदलले. विराटने टी२० संघाचे कर्णधारपद स्वेच्छेने सोडले. त्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतले गेले. रोहित शर्मा सध्या टी२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. आता विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले आहे आणि ही जबाबदारी कोणता खेळाडू घेणार, याविषयी अजून अस्पष्टता आहे.

महत्वाच्या बातम्या –

एक शतकी खेळी आणि विक्रमांची रांग! डी कॉकने सोडले रथी-महारथींना मागे

टीम इंडियासाठी ‘विलन’ ठरतोय रिषभ! यष्टिरक्षणातील चुकांची मोजावी लागतेय संघाला किंमत

‘विराटने स्वत:हून कॅप्टन्सी सोडाली नाही, त्यासाठी त्याला भाग पाडले गेले’, पाकिस्तानी दिग्गजाची वादग्रस्त प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहा –

अंघोळीत बिझी असलेल्या VVS Laxman मुळे Sourav Ganguly ची झालेली पंचायत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---