---Advertisement---

बापरे! पदार्पणाच्या पहिल्याच षटकात या क्रिकेटपटूने घेतली हॅट्रिक

On: सोमवार, जानेवारी 27, 2020 6:59 PM
---Advertisement---

इंदोर। आजपासून(27 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या सातव्या फेरीचे सामने सुरु झाले आहेत. या फेरीत उत्तरप्रदेशचा सामना मध्यप्रदेश विरुद्ध होत आहे. या सामन्यात मध्यप्रदेशच्या रवी यादवने हॅट्रिक घेतली आहे.

विशेष म्हणजे हा त्याचा पहिलाच प्रथम श्रेणी सामना असून त्याने पहिलेच षटक टाकताना हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. उत्तरप्रदेश पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मध्यप्रदेशचा कर्णधार नमन ओझाने सातव्या षटकात रवीकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला.

रवीनेही हा विश्वास सार्थ ठरवत या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे आर्यन जुयाल(13), अंकित राजपूत(0) आणि समीर रिझवी(0) यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली. रवीने राजपूत आणि रिझवी यांना त्रिफळाचीत केले तर जुयाल झेलबाद झाला.

त्यामुळे उत्तरप्रदेशची आवस्था या सामन्यात पहिल्या दिवसाखेर 8 षटकात 3 बाद 22 धावा अशी झाली आहे.

विशेष म्हणजे प्रथम श्रेणीच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिलेच षटक टाकत असताना हॅट्रिक घेणारा रवी पहिलाच गोलंदाज ठरला आहे. 

तत्पूर्वी या सामन्यात मध्यप्रदेशचा पहिला डाव 230 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यांच्याकडून यश दुबेने सर्वाधिक 70 धावांची अर्धशतकी खेळी केली तर अजय रोहेराने 42 धावांची खेळी केली. तसेच रवी फलंदाजी करताना 7 धावांवर नाबाद राहिला.

https://twitter.com/Maha_Sports/status/1221778468494397443

https://twitter.com/Maha_Sports/status/1221749949773139971

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---