आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (8 जानेवारी) नवी वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगलाच संघर्ष होताना दिसत आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हे संयुक्तपणे पहिल्या स्थानी असून, अहमदाबाद कसोटीत अश्विन याला पुढे जाण्याची संधी आहे.
Nothing to separate between two quality bowlers 👊
The race for the top spot in the @MRFWorldwide ICC Men's Test Bowling rankings is heating up 🔥
Details 👇https://t.co/yC3mutQeVs
— ICC (@ICC) March 8, 2023
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अश्विन व अँडरसन प्रत्येकी 859 गुणांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर काबीज आहेत. मागील काही काळापासून अश्विन आणि अँडरसन यांच्या दरम्यान पहिल्या क्रमांकासाठी जोरदार लढत होताना दिसतेय. न्यूझीलडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अँडरसन याने पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र, अश्विनने इंदोर कसोटीत चमकदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावलेले. आता इंग्लंड कोणत्याही प्रकारचे कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याने अश्विन याच्याकडे या स्थानावर कब्जा करण्याचा मौका असेल. यासाठी त्याला अहमदाबाद कसोटीत पाच पेक्षा अधिक बळी घ्यावे लागतील.
या दोघांना दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा टक्कर देताना दिसतोय. वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आठ बळी मिळवत त्याने तीन स्थानांची प्रगती केली आहे. तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून, दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करून तो पहिल्या स्थानी देखील येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी न खेळण्याचा तोटा सहन करावा लागणार आहे. तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर असला तरी, तो अवल पाचमधून बाहेर पडू शकतो.
(Ravichandran Ashwin And James Anderson Becomes Joint ICC Number One Test Bowlers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार