चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघांदरम्यान चालू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत आहे. दोन्ही संघाचे पहिल्या डावातील खेळ संपले असून भारताने १९५ धावांनी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३० धावांचे लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ अवघ्या १३४ धावांवर गारद झाला. यादरम्यान भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने पुन्हा एकदा बेन स्टोक्स याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फासले. यासह अश्विनने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडचा संघनायक जो रुटची विकेट पडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर स्टोक्स फलंदाजीला आला होता. ५२.९४ च्या सरासरीने सरासरीने फलंदाजी करताना स्टोक्सने ३४ चेंडूत १८ धावा काढल्या. या खेळीदरम्यान त्याने एक चौकार मारला. अखेर डावातील २३.२ षटकात अश्विनने जबरदस्त चेंडू टाकत स्टोक्सचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे स्टोक्स हा अश्विनचा तब्बल २०० वा डावखुरा शिकार ठरला आहे.
अश्विनपुर्वी श्रीलंकन दिग्गज मुथैय्या मुरलीधरनच्या नावे या विश्वविक्रमाची नोंद होती. फिरकीपटू मुरलीधरनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ८०० विकेट्स घेतल्या असून त्यातील १९१ फलंदाज हे डावखुरे होते. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९१ डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्याचा मोठा किर्तीमान मुरलीधरनने आपल्या नावे केला होता. परंतु अश्विनने कसोटीत केवळ ३९१ विकेट्स घेत मुरलीधरनवर वरचढ ठरला आहे.
वेगवान गोलंदाजांविषयी बोलायचे झाले, तर कसोटीत सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम जेम्स अंडरसनने केला आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत १९० वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले आहे. परंतु एकंदरीत पाहायचे झाले तर, अंडरसनचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो.
Most Test Wickets of LHB
200 (391) 51.15% Ashwin*
191 (800) 23.87% Murali
190 (611) 31.09% Anderson
172 (563) 30.56% McGrath
172 (708) 24.29% Warne
167 (619) 26.97% Kumble
153 (514) 29.76% Broad
147 (399) 36.84% Lyon
139 (417) 33.33% Harbhajan
136 (439) 30.98% Steyn#INDvENG— Vidhu Pal (@vidhu_pal) February 14, 2021
याबरोबरच ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लायन, हरभजन सिंग, डेल स्टेन यांचाही टॉप-१० मध्ये समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्ससाठी ‘हे’ गोलंदाज धोक्याची घंटा, धाडलंय सर्वाधिक वेळा तंबूत; आर अश्विनचाही समावेश
वाह रे अश्विन ! २०१५ पासून गाजवतोय कसोटी क्रिकेट, आकडे पाहून थक्क व्हाल