---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला मृत्यूचा उल्लेख, अश्विनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: बुधवार, मे 5, 2021 2:17 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ नेहमीच आपल्या आजी -माजी खेळाडूंच्या जन्मदिवस व विशेष कामगिरीबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे शुभेच्छा देत असतात. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या माजी खेळाडूला शुभेच्छा देताना एक वेगळेच ट्विट केले, त्यामुळे त्यावर अनेकांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचाही समावेश होतो.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला माजी खेळाडू मंजरुल इस्लाम राणा याच्या वाढदिवसाच्या ट्विटमध्ये त्याच्या मृत्यूचा देखील उल्लेख केला. मंजुरल इस्लाम राणा हा बांगलादेशचा माजी खेळाडू होता. तो वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी एका अपघातात मृत्युमुखी झाला होता.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, “मंजरुल इस्लाम राणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वात युवा कसोटी क्रिकेटर जो केवळ 22 वर्ष आणि 316 दिवस वय असताना मृत्युमुखी पडला.”

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या या वेगळ्याच आशयाच्या ट्विटवर अश्विनने देखील धक्का बसल्याच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारा एक ईमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. काही कालावधीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डला आपली चूक समजली व त्यांनी ते ट्विट डिलीट केले, मात्र तोपर्यंत अनेकांनी त्याचा स्क्रीन शॉट घेतलेला होता.

Screengrab: Twitter/ashwinravi99

यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या नव्या ट्विटमध्ये आपली चूक दुरुस्त केली. त्यांनी लिहिले,”मंजरुल इस्लाम राणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्याकडे असलेल्या सर्वात महान टायगर्समधील एक.”

मंजरुलने आपल्या कारकीर्दीमध्ये एकूण 6 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले होते. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 331 धावा केल्या तसेच 23 विकेट घेतल्या होत्या; तर कसोटीमध्ये 257 धावा केल्या व 5 विकेट घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

एकच नंबर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने घेतलेला एकहाती नेत्रदीपक झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

डॅडी तुम्ही थेट घरी या! डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकीने वडीलांसाठी लिहिले भावनिक पत्र

आयपीएल २०२१: कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अमित मिश्रा हॉस्पिटलमध्ये दाखल, दिल्ली संघाने दिली ‘ही’ माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---