भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. तत्पूर्वी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना शानदार शतक झळकावले, तर गोलंदाजीदरम्यान एकाच डावात 6 विकेट्स घेतल्या. पण भारताच्या विजयानंतरही अश्विन नाराज आहे? या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
वास्तविक, रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) त्याच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवशी कोणीही गिफ्ट दिले नाही याचे दुःख झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर अश्विनने याचा खुलासा केला. मंगळवारी (17 सप्टेंबर) रोजी अश्विनचा 38वा वाढदिवस होता. सामन्यानंतर बोलत असताना हर्षा भोगलेने (Harsha Bhogle) अश्विनला सांगितले की, मी ऐकले आहे की लोक त्यांच्या वाढदिवसाला इतरांना चांगल्या भेटवस्तू देतात. आपण स्वत: ला दिले हे चांगले आहे.
यावर उत्तर देताना अश्विन म्हणाला की, “मला कोणीही गिफ्ट दिले नाही, त्यामुळे मी स्वतःला गिफ्ट देण्याचा विचार केला.” बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत भारतासाठी अश्विनने शानदार अष्टपैलू खेळी दाखवली. अश्विनने दिलेल्या योगदानामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यात लवकर यश आले. चमकदार कामगिरीमुळे अश्विनला सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच भारताने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना (27 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर) कानपूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यासाठी देखील भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताने पहिल्या सामन्यासाठी जो संघ होता तोच संघ रिटेन केला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहं. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
580 सामने आणि 92 वर्ष! भारताच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं
‘तो खूप कठीण…’, रिषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रोहित शर्मा भावूक
अश्विनची अष्टपैलू कामगिरी, पंतचं ड्रीम कमबॅक; भारत-बांगलादेश कसोटीच्या 5 महत्वाच्या घटना जाणून घ्या