भारतीय संघचे वनडे विश्वचषक 2023मध्ये वर्चस्व राहिले आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघात विश्वचषक स्पर्धेत जास्त बदल होताना दिसले नाही. आतापर्यंत 9 पैकी 9 सामने भारताने जिंकले असून अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे. पण त्याआधी भारताच्या माजी दिग्गजाने संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय संघासाठी या विश्वचषक स्पर्धेत जवळपास प्रत्येक खेळाडू महत्वाचा ठरला आहे. मोहम्मद शमी, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि स्वतः कर्णधार रोहित शर्मा यांच्या खेळीचे कौतुक होत आहे. संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रवळ दावेदार मानला जात होता आणि अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास एकाही अडथळ्याविना त्यांनी पार केला आहे. सर्व खेळाडू चांगल्या लयीत असले तरी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला विसरून चालणार नाही. अश्विनला विश्वचषक स्पर्धेसाठी ऐन वेळी निवडण्यात आले. पण आतापर्यंत झालेल्या 9 पैकी फक्त एका सामन्यात त्याला संधी दिली गेली.
असे असले तरी, आगामी सामन्यात संघ व्यवस्थापन अश्विनला संघात घेण्याबाबत एकदा विचार करू शकते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात अश्विन आपल्या फिरकीची जादू दाखवू शकतो. खेलपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यास संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज मदनलाल यांनी खास प्रतिक्रिया दिली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मदनलाल म्हणाले की, “संघातील अश्विनची निवड खेळपट्टीवर अवलंबून असेल. असे असले तरी, मला नाही वाटत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला विजय मिळवून देणाऱ्या संघात बदल करेल. ऑस्ट्रेलियाला तरबेज शम्सी याची गोलंदाजी खेळताना अडचण येत होती. त्याच पद्धतीने कुलदीपला खेळतानाही त्यांना अडचण येऊ शकते. मला पूर्ण विश्वास आहे की, अहमदाबादमध्ये फलंदाजी करण्यासाठी एक चांगली खेळपट्टी असेल.”
मदन लाल यांनी अश्विनला संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली असली, तरी चर्चेत सहभागी सुनील गावसकरांना तसे वाटत नाही. गावसकरांच्या मते अश्विनला खेळण्याची संधी मिळेल, याची कुठेच शक्यता नाही. असे झाले, तर मोहम्मद सिराज याला बाहेर बसावे लागेल, जे संघाला परवडणारे नाही, असे गावसकरांना वाटते. दरम्यान, अश्विनने विश्वचषक हंगामात खेळलेला एक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात अश्विनने 10 षटकात 34 धावा खर्च करून 1 विकेट घेतली होती. (Ravichandran Ashwin may get a chance in the World Cup final against Australia)
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीजमध्ये देशभरांतून 140हून अधिक खेळाडू सहभागी
भारतासाठी ‘अनलकी’ पंच अंतिम सामन्यात मैदानात उतरणार! संघाला बदलावी लागणार परंपरा