भारत आणि इंग्लंड यांच्य़ातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघमच्या मैदानात सुरू झाला आहे. यात भारतीय संघाने ज्या खेळाडूंना संधी दिली आहे, त्यावरुन आता टिकेचा सामना भारतीय संघव्यवस्थापनाला करावा लागलत आहे. भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंत स्थान देण्यावरुन अनेक भारतीय दिग्गजांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघात अश्र्विनला स्थान न दिल्याने त्याने नाराजी व्यक्त केली.
यावर बोलताना लक्ष्मण म्हणाला “माझ्या मते अश्विन हा भारतीय संघातील एक चतुर आणि महत्वाचा गोलंदाज आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्या प्रकारे अश्विनने प्रदर्शन केले होते, ते अत्यंत महत्त्वाचे होते. ज्या पद्धतीने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन धूळ चारली, ती अतुलनीय कामगिरी होती.”
“अश्विनने यात गोलंदाज म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने स्टीव्ह स्मिथसारख्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. यातून एक गोलंदाज म्हणून त्याच्यातील आत्मविश्वास दिसून येतो. त्याचबरोबर त्याने फलंदाजी करताना देखील अत्यंत चांगली कामगिरी करत भारताचा एक सामना अनिर्णित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.”
“मी पाहतोय की, सध्याच्या भारतीय संघात शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे. जो की एक मध्यमगतीचा गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो फलंदाजीतही आपले योगदान देऊ शकतो.”
“पण मला विचाराल तर मी गोलंदाज म्हणून अश्विनचीच निवड करेन, जो संघासाठी ८ व्या क्रमांकावर देखील फलंदाजी करेल. जो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. जागतीक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळलेला संघच माझ्यासाठी एक संतुलित संघ होता”.
पु़ढे तो म्हणाला “मला हे समजत नाहीये की, विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनेने कोणता तर्क ठेवून संघाची बांधणी केली. मला तर एकच तर्क दिसतो, तो म्हणजे ठाकूर जो शेवटच्या फळीत देखील फलंदाजी देखील करू शकतो. ज्या प्रकारे त्याने ब्रिस्बेनमध्ये गोलंदाजी केली होती ती उल्लेखनीय होती. परंतू तरीही मला वाटते की, अश्विनला भारतीय संघात संधी मिळायली हवी होती. कारण तो जगातील महान गोलंदाजांपैकी एक आहे.
भारताकडून व्हीव्हीएस लक्ष्मणने १३४ कसोटी व ८६ वनडे सामने खेळले आहे. त्यात त्याने अनुक्रमे ८७८१ व २३३८ धावा केल्या आहेत. ज्याच्या निवडीमुळे लक्ष्मण नाराज आहे त्या अश्विनने कसोटी कारकिर्दीत ७९ सामन्यात २४.५६च्या सरासरीने ४१३ विकेट्स घेतल्या आहे व २७.६७च्या सरासरीने २६८५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने कसोटीत ५ शतकं देखील केली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-रोहित शर्मा-केएल राहुलची विक्रमी भागीदारी, तब्बल १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये घडला झाला ‘तो’ पराक्रम
–‘या’ मुंबईकरामुळे पांड्याची टीम इंडियातील जागा आहे धोक्यात, कमबॅकही झालंय अवघड
–विराटने वाईट दिवसांची काढली आठवण; म्हणाला, ‘कठीण काळात सचिनला मदत मागितली आणि…’