सिडनी। गुरुवारपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने आज 13 जणांचा संघ घोषित केला आहे.
या संघात भारताचा फिरकीपटू आर अश्विनलाही संधी देण्यात आली आहे. पण त्यानंतर काही वेळातच तो सिडनी कसोटी खेळणार नसल्याचे वृत्त आले आहे. त्याला पोटाच्या स्नायूंची दुखापत आहे. या दुखापतीमुळे अश्विन पर्थ आणि मेलबर्न कसोटीलाही मुकला होता.
अश्विनच्या दुखापतीबद्दल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले की ‘ही खूप निराश करणारी गोष्ट आहे की तो पूर्णपणे बरा झालेला नाही. अश्विनबरोबर फीजियोथेरेपिस्ट आणि प्रशिक्षकांनी चर्चा केली आहे. तो नक्कीच संघासाठी महत्त्वाचा आहे. तो कसोटीमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्हाला तो 100 फिट असावा असे वाटत आहे.’
सिडनी कसोटीसाठी निवड झालेल्या 13 जणांच्या संघात केएल राहुल, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांनाही संधी मिळाली आहे. तसेच जेव्हा 13 जणांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता तेव्हा अश्विनच्या सहभागाबद्दल सामना होण्यापुर्वी निर्णय घेण्यात येणार आहे, असे बीसीसीआयने म्हटले होते.
याबरोबरच दुखापतीमुळे इशांत शर्माही सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. तर रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतला आहे. रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.
असा आहे 13 सदस्यांचा भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या:
–स्म्रीती फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आहे तरबेज!
–वडीलांच्या निधनानंतरही तो खेळाडू खेळत होता संघासाठी…
–क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०१८ वनडे संघाचा विराट कोहली झाला कर्णधार