भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) मैदानावर ज्याप्रकारे उत्कृष्ट गोलंदाजी करतो. मैदानाबाहेर बोलतानाही तो अशाच उत्कृष्ट प्रकारे स्वतःचे मुद्दे मांडतो असे सांगितले जाते. विराट कोहलीने १५ जानेवारीला भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. रविवारी अश्विनने यासंदर्भात सविस्तर ट्वीट करून स्वतःचे मत व्यक्त केले आहे.
त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून अश्विनने विराट कोहलीसाठी खास तीन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला आहे की, “क्रिकेट कर्णधारांबद्दल नेहमी त्यांच्या विक्रमाविषयी आणि त्यांनी कोणत्या प्रकारे विजय मिळवून दिला, याविषयी बोलले जाईल. पण कर्णधार म्हणून तुझा वारसा, तू सेट केलेल्या बेंचमार्कमुळे उभा राहीला. अशी लोकं असतील, जे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका इत्यादी जागी मिळवलेल्या विजयासंदर्भात चर्चा करतील.”
Cricket captains will always be spoken about with respect to their records and the kind of triumphs they managed, but your legacy as a captain will stand for the kind of benchmarks you have set. There will be people who will talk about wins in Australia, England , Sl etc etc
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 16, 2022
“विजय हा फक्त एक परिणाम आहे. बीज नेहमी पिकाच्या आधी चांगल्या प्रकारे पेरले जाते. हेच बीज पेरण्यामध्ये तू यशस्वी ठरला. तू स्वतःसाठी ज्याप्रकारे स्टँडर्ड्स सेट केले आहेत, आमच्याकडून देखील तशीच अपेक्षा ठेवली. खूप शुभेच्छा विराट कोहली. तू तुझ्या उत्तराधिकारीसाठी डोकेदुखी सोडून गेला आहेस आणि ही तुझ्या कर्णधारपदाची खासीयत राहिली आहे. आपण एवढ्या उंचीवर एक जागा सोडली पाहिजे की, भविष्य त्याला अजून उंचीवर नेईल.” असे अश्विन पुढेच्या ट्वीटमध्ये म्हटला आहे.
have left behind for your successor and that’s my biggest takeaway from your stint as captain. “We must leave a place at such an altitude that the future can only take it higher from there on “ 👏👏👏 #Virat #CricketTwitter
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 16, 2022
विराच कोहलीच्या नेतृत्वात अश्विनचे प्रदर्शन अधिक सुधारले
एका कसोटी गोलंदाजाच्या रूपात रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीच्या नेतृत्वात अधिक चांगले प्रदर्शन आणि सुधारणा केली. विराटच्या नेतृत्वातील ५५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २२.१३ च्या सरासरीने २९३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने २१ वेळा एका डावात पाच विकेट्सची किमया साधली आहे. त्याव्यतिरिक्त विराटच्या नेतृत्वात अश्विनने मायदेशात खेळल्या कसोटी सामन्यांमध्ये विशेष योगदान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा
धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’
व्हिडिओ पाहा –