रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. माऊंट माऊंगनुई येथे दुपारी 12 वाजता होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ निवडला आहे. या संघातून त्याने भारताच्या मोठ्या खेळाडूंची हाकालपट्टी केली आहे. चला तर पाहूयात अश्विनने नेमकं कुणाला घेतले आहे आणि कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
या खेळाडूंना काढले बाहेर
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी आपल्या आवडत्या भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या संघातून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांसारख्या अनुभवी खेळाडूंना बाहेर बसवले आहे.
अश्विनने या प्लेइंग इलेव्हनमध्ये मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा यांना संधी दिली आहे. तसेच, सलामीवीर म्हणून रिषभ पंत आणि ईशान किशन यांच्यापैकी एक खेळेल. तसेच, दुसरा सलामीवीर म्हणून शुबमन गिल याला स्थान दिले आहे. अश्विन म्हणाला की, जर पंतने डावाची सुरुवात केली नाही, तर त्याला मधल्या फळीत जागा दिली पाहिजे.
गोलंदाजी फळीबद्दल बोलायचं झालं, तर अश्विनच्या संघात तीन पूर्णवेळ वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूचा समावेश आहे. त्यामध्ये हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचा वेगवान गोलंदाज म्हणून संघात समावेश केला आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल याला संधी दिली आहे.
मात्र, अश्विनच्या संघात सामील असणारे तिन्ही गोलंदाज अनुभवाच्या बाबतीत भुवनेश्वर कुमार याच्या मागे आहेत. भुवनेश्वर न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर स्विंग मिळवण्याची क्षमता राखतो. चहलला मनगटी फिरकी गोलंदाज म्हणून सामील केले गेले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर आता दुसरा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे. (ravichandran ashwin picks indian playing eleven for 2nd t20 against new zealand)
आर अश्विनने निवडलेली भारतीय प्लेइंग इलेव्हन
शुबमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार). दीपक हुड्डा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमाईच्या बाबतीत बीसीसीआय सर्वांचा बाप! पाकिस्तान तर आसपासही नाही, 2021मध्ये कमावले ‘एवढे’ कोटी
रोहितने फिटनेसचे घेतले मनावर, वर्ल्डकप हारुन आल्यावर लगेच सुरू केली रनिंग