आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (15 मार्च) खेळाडूंची नवी वैयक्तिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. गोलंदाजांच्या नव्या क्रमवारीत भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक बळी मिळवत त्याने इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला.
A whole host of India stars have climbed the charts in the @MRFWorldwide ICC Men's Player Rankings after the Border-Gavaskar triumph 👊
Details 👇
— ICC (@ICC) March 15, 2023
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटी पूर्वी अश्विन व अँडरसन संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, अश्विनने अहमदाबाद कसोटी चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात सात बळी मिळवत अँडरसनला मागे टाकले. आता अश्विनच्या नावे 869 रेटिंग गुण झाले असून, अँडरसन 659 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. त्याला आता अश्विनला मागे टाकण्यासाठी थेट ऍशेस मालिकेची वाट पहावी लागेल. यादरम्यान अश्विनला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चा अंतिम सामना खेळण्याची संधी देखील मिळू शकते.
क्रमवारीचा विचार केल्यास या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा आहे. त्याच्या नावे 841 रेटिंग गुण आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर 825 गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा व पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी 787 गुणांसह काबीज आहे. भारतीय संघाचे जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा हे प्रत्येकी एका स्थानाच्या नुकसानासह अनुक्रमे सातव्या व नवव्या स्थानी घसरले आहेत.
अश्विन याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका संस्मरणीय ठरली. त्याने मालिकेतील प्रत्येक सामन्यात आपले योगदान दिले. त्याने या मालिकेत सर्वाधिक 25 बळी टिपले. यासह त्याने रवींद्र जडेजासोबत मालिकावीर पुरस्कार देखील आपल्या नावे केला.
(Ravichandran Ashwin Reach ICC Number One Test Bowler Anderson At Second)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी