वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात आहे. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील वाद विश्वचषकादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. सोमवारी (7 नोव्हेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात हा वाद पाहायला मिळाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेशने हा सामना सामना 3 विकेट्सने जिंकला. बांगलादेशच्या विजयानंतर शाकिब आणि मॅथ्यूज यांच्या वादाविषयी जगभरातील जाणकार प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारतीय दिग्गज फिरकीपटू रविंचंद्रन अश्विन यानेही आपले मत मांडले.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. मांकडिंग म्हणजेच सध्याच्या रन आऊट नियमाला आयसीसीकडून मान्यता मिळवून देण्यात अश्विनची भूमिका महत्वाची राहिली आहे. सोमवारी (7 नोव्हेंबर) अँजेलो मॅथ्यूज () आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट नियमानुसार बाद होणारा पहिला खेळाडू ठरला. मॅथ्यूज खेळपट्टीवर वेळत आला होता. मात्र, हेलमेटची स्ट्रॅप तुटल्यामुळे त्याला तीन मिनिटांच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळता आला नाही. परिणामी मॅथ्यूजला या सामन्यात एकही चेंडू न खेळता विकेट गमवावी लागली. शाकिब अल हसन याच्यावर खेळाडू वृत्ती न दाखवल्यामुळे अनेकजण टिका करत आहेत. अशातच रविचंद्रन अश्विनची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
रविचंद्रन अश्विन स्वतःच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, “एक गट नियांविषयी बोलत आहे, तर दुसरा गट खेळ भावणेविषयी बोलत आहे. मॅथ्यूज फलंदाजीला आल्यानंतर त्याचे हेलमेट ठीक नव्हते आणि तो हेलमेड बदलू इच्छित होता. मी अजून एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये शाकिब श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात गार्ड न लावता आला होता. नंतर त्याने परवानगी घेतली आणि गार्ड मागवले.”
“हा मुद्दा या दोन्ही देशांमध्ये एखाद्या युद्धाप्रमाणे बनला आहे. मला हे मान्य आहे की, टाईम आऊट असल्यामुळे शाकिबने योग्य अपील केली. पंचांनीही त्याला बाद घोषित केले. मॅथ्यूजला पंचांनी टाईम आऊटबाबत आधिच चेतावनी दिली होती. पण त्यानंतर मॅथ्यूज या निर्णयामुळे निराश आहे. त्याची नाराजीही चुकीची म्हणता येणार नाही. कोणत्याही खेळाडूसाठी अशा प्रकारची विकेट स्वीकारणे कठीण आहे. कोणालाही या निर्णयाचे वाईट वाटेल,” असे अश्विन पुढे म्हणाला.
अश्विनने पुढे बोलताना दोन्ही खेळाडू आपल्या भूमिकेवर ठाम आणि योग्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “दोघेही आपल्या-आपल्या जागी योग्य आहेत. एक नियमांचे पालन करत आहे, तर दुसरा हेलमेटमध्ये खराबी आल्यामुळे शिकार बनला. शिकार ठरलेल्या व्यक्तीने नियमांनुसार अपील करणाऱ्या व्यक्तीकडे अपील मागे घेण्यासाठी विचारणा केली. पण समोरच्या व्यक्तीने अपील मागे घेतली नाही.”
(ravichandran ashwin reactsto angelo mathews time out)
महत्वाच्या बातम्या –
बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record
हुश्श शेवटी पकडलाच! रहमतला तंबूत पाठवण्यासाठी मिलरने केली प्रयत्नांची पराकाष्ठा, पाहा व्हिडिओ