भारताचा महान क्रिकेटपटूंपैकी एक रविचंद्रन अश्विनने 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. या ऐतिहासिक कारकिर्दीत त्याने 700 हून अधिक विकेट्स घेतल्या, 4 हजारांहून अधिक धावा केल्या आणि 6 शतकी खेळीही खेळली. पण लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे का? अश्विन आयपीएल 2025 मध्ये खेळणार नाही का? चला तर मग जाणून घेऊयात.
पावसामुळे गाबा कसोटी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आर अश्विनने आपल्या निवृत्तीच्या भाषणात सांगितले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. मला अजूनही क्रिकेटची भूक आहे. मी क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये माझे कौशल्य दाखवू इच्छितो. मी रोहित आणि इतर मित्रांसोबत खूप आठवणी शेअर केल्या आहेत.”
अश्विन पुढे म्हणाला, “जुन्या खेळाडूंपैकी फक्त काही निवडक खेळाडू संघात उरले आहेत. मला विश्वास आहे की या स्तरावर माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट आहे. मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत. मी बीसीसीआय आणि सर्व सहकारी खेळाडूंचे आभार मानतो. मी त्यांच्यापैकी काहींचे नाव घेऊ इच्छितो. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जे माझ्या प्रवासात उच्चस्तरीय क्रिकेटपटू राहिले आहेत. सोबतच ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे देखील आभार, जो नेहमीच स्पर्धात्मक क्रिकेट खेळला आहे. त्यांच्याविरुद्धच्या खेळाताना मी खूप मी आनंद घेतला.”
अश्विनने आपल्या निवृत्तीच्या भाषणात म्हटले आहे की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमधूनच निवृत्ती घेत आहे. तो फ्रँचायझी आणि क्लब क्रिकेट खेळत राहील. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने 9.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2015 नंतर अश्विन सीएसकेकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.
हेही वाचा-
भारताचा फिरकीचा जादुगार रविचंद्रन अश्विनची संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…!
14 वर्षे, 765 विकेट्स…., असं होतं रविचंद्रन अश्विनचं आंतरराष्ट्रीय करिअर!
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले