---Advertisement---

वारंवार मैदानात घुसणाऱ्या ‘त्या’ चाहत्यावर भडकला अश्विन, म्हणाला…

On: शनिवार, ऑगस्ट 28, 2021 3:15 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. पहिले दोन दिवस यजमानांनी सामन्यावर वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. मात्र, भारतीय संघाचा इंग्लिश चाहता जार्वो पुन्हा एकदा मैदानात घुसल्याने भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नाराजी व्यक्त केली.

पुन्हा मैदानात घुसला जार्वो
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत झाला. यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार कोहली फलंदाजीस येणे अपेक्षित होते. मात्र कोहलीऐवजी अचानकपणे जार्वो हा ब्रिटिश नागरिक पूर्ण तयारीनिशी मैदानात आला. ज्यानंतर त्याने ‘बॅटिंग गार्ड’ देखील घ्यायला सुरुवात केली होती. या घटनेला पाहून पंच देखील आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ओढत मैदानाबाहेर नेले.

अश्विनने दिली अशी प्रतिक्रिया
जार्वो सलग दुसऱ्या सामन्यात मैदानात घुसल्याने अनेकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. तिसर्‍या दिवसाच्या खेळानंतर भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने एक ट्विट केले. त्याने लिहिले,
‘आजचा खेळ तितकाच चांगला होता जितका रोहित, पुजारा, विराट आणि जार्वो यांनी धैर्य आणि संयम दाखवून खेळला. असेच पुढे चालत राहा आणि त्या जार्वोला मैदानात येऊ देऊ नका.’

सलग दुसऱ्या सामन्यात मैदानात घुसला जार्वो
ब्रिटनचा नागरिक असलेला जार्वो स्वतःला भारतीय क्रिकेट संघाचा चाहता म्हणवतो. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही तो अशाच पद्धतीने मैदानात घुसला होता. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना तो मैदानात आल्याने सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपण भारतीय संघाचा सदस्य असल्याचे सांगत जर्सीकडे बोट दाखवले होते. त्यावेळी भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने तुला कोणत्या बाजूने गोलंदाजी करायला आवडेल? असा प्रश्न विचारलेला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’

क्रिकेटच्या काळ्या अध्यायाला १२ वर्षे: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण

‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---