Ravichandran Ashwin Century : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विनने शानदार कामगिरी करत शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यानं रवींद्र जडेजासोबत 8 व्या गड्यासाठी 195 धावांची भागिदारी केली. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या अश्विन याच्या या खेळीचे साक्षीदार होण्याची संधी त्याचे आई व वडिलांना मिळाली. आपल्या मुलाचे कौतुक करताना त्याच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतानं 144 धावांवर 6 बळी गमावले. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी प्रथम आपली अर्धशतके साजरी केली. यानंतर दिवसाच्या शेवटी अश्विनने आपले शतक पूर्ण केलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. भारताने दिवसाअखेर 6 गडी गमावून 339 धावा केल्या. सध्या अश्विन (102) आणि रवींद्र जडेजा (86) नाबाद आहेत. अश्विनने 108 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केलं. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले.
Ravi Ashwin’s father enjoying Ashwin masterclass at Chepauk. pic.twitter.com/yN9sGqBCFk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2024
चेन्नईमध्ये होत असलेल्या या सामन्यासाठी त्याच्या आई व वडिलांनी देखील उपस्थिती दर्शविली. अश्विन याने अर्धशतक केल्यानंतर त्याच्या पालकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अश्विनचे वडील हेच त्याचे पहिले प्रशिक्षक देखील आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात अश्विन याने क्रिकेटचे धडे गिरवलेले. त्याचे वडील अजूनही चेन्नईमध्ये क्रिकेट अकादमी चालवतात.
An applause for @ashwinravi99 across ages! 👏👏
Live – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/SsE9w5VV4u
— BCCI (@BCCI) September 19, 2024
घरच्या मैदानावर अश्विन याने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोलंदाजीत तो सातत्याने संघाच्या विजयात योगदान देत असतो. विशेष म्हणजे सध्या भारतीय संघात खेळत असलेल्या फलंदाजांपैकी अश्विन, चेपॉकवर सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहली याला या कसोटीच्या पहिल्या डावात अपयश आले. विराट केवळ सहा धावा बनवू शकला.
हेही वाचा –
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद
शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलच्या नावे नकोसा रेकॉर्ड, विराट कोहलीचाही लिस्टमध्ये समावेश