विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. तब्बल ७ वर्षानंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय महिला संघाने शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये खेळला होता. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांना या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघात असे अनेक युवा महिला क्रिकेटपटू आहेत, ज्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाहीये. कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला रवींद्र जडेजाने ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “देशासाठी क्रिकेट खेळणे हा नेहमीच एक विलक्षण अनुभव असतो. आम्ही आमच्या महिला संघाला सात वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळताना पाहण्यास सक्षम आहोत याचा आम्हाला आनंद होत आहे. मी त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.” (Ravindra given good wishes to Indian women’s cricket team for test match against England women’s cricket team)
Playing Test cricket for the country is always a special feeling. It feels great that we will be able to witness our women's team competing in Test cricket after seven years. I would like to wish the girls goodluck in their game against England. 🇮🇳🙏@BCCIWomen
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) June 15, 2021
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर इंग्लंड महिला संघाला ६ बाद २६९ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली, तर तामसिन ब्यूमॉन्टने ६६ धावांचे योगदान दिले. तसेच भारतीय महिला संघाकडून गोलंदाजी करताना, स्नेह राणाने २९ षटकात ७७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले, तर दीप्ती शर्माने १८ षटके गोलंदाजी करताना ५० धावा देत २ गडी बाद केले. तसेच पूजा वस्त्राकरने १२ षटके गोलंदाजी केली. यात तिने ४३ धावा देत १ गडी बाद करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा