जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामाला शनिवारी (२६ मार्च) सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSKvKKR) यांच्यातील सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातून श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी तर, रवींद्र जडेजा याने चेन्नई सुपर किंग्ससाठी कॅप्टन्सी डेब्यू केला. त्याचवेळी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आपल्या नावे एक खास विक्रम नोंदवला.
आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, धोनीने चेन्नईचे नेतृत्व सोडले होते. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजा नेतृत्व करणार असल्याचे सांगण्यात आलेले. हंगामातील पहिल्या सामन्यात जडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरताच एक नवा विक्रम त्याच्या नावे झाला. (CSK Captain Ravindra Jadeja)
जडेजा आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०१ वा सामना खेळत आहे. आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याआधी त्याने २०० सामने खेळले आहेत. याचबरोबर जडेजा सर्वात जास्त सामने खेळल्यानंतर कर्णधार बनला आहे. यापूर्वी मनीष पांडेने १५३ सामने खेळल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केलेले. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने १३७ आयपीएल सामने खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतलेली. या यादीमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसन आणि भुवनेश्वर कुमार येतात. त्यांनी अनुक्रमे १०७ व १०३ आयपीएल सामने खेळल्यानंतर राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबादची कमान सांभाळलेली.
नाणेफेक केकेआरच्या पारड्यात
या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात चेन्नईचे सुरुवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड खातेही न खोलता पहिल्याच षटकात बाद झाला. तसेच पदार्पण करणारा डेवॉन कॉनवे हा देखील तीन धावा करून तंबूत परतला.
महत्वाच्या बातम्या-
रिकी पाँटिंगला ‘या’ खेळाडूमध्ये दिसतोय भारताचा भावी कर्णधार, रोहितशी तुलना करत सांगितले साम्य
पहिला सामना | केकेआरकडून रहाणेचे पदार्पण, तर सीएसकेकडून धाकड सलामीवीराला संधी; पाहा प्लेइंग XI