---Advertisement---

आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 4:36 PM
MS-DHoni-Ravindra-Jadeja
---Advertisement---

सर्व फ्रँचायझींनी इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२, IPL 2022) साठी तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच या हंगामासाठी मेगा लिलावही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) (सीएसके) आपली पूर्वतयारी पूर्ण करण्याकडे भर देतो आहे. नुकतेच सीएसके (CSK)ने संघातील नेतृत्त्वबदलाबद्दल (Captaincy Change) मोठे संकेत देत चाहत्यांना चकित केले आहे. 

सीएसके संघ आणि कर्णधार धोनी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, संघ व्यवस्थापन आता भविष्याचा विचार करून पुढील तयारी करू इच्छित आहे. याच धर्तीवर आता धोनी संघातील आपले नेतृत्त्वपद अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला देऊ शकतो. त्यामुळे येत्या हंगामात धोनी सीएसकेच्या मार्गदर्शकाच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे.

सीएसकेने आपल्या ट्वीटर पोस्टद्वारे यासंदर्भात संकेत दिले (CSK Gives Hint) आहेत. त्यांनी धोनी आणि जडेजाचा मैदानावर एकमेकांना आलिंगण घालतानाचा फोटो शेअर केला आहे.

सीएसकेची पहिली निवड होता रविंद्र जडेजा
सीएसकेने आयपीएल २०२२ साठी ४ खेळाडूंना संघात कायम केले आहे. यामध्ये एमएस धोनीबरोबर रविंद्र जडेजा आणि मागील हंगामात संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच परदेशी खेळाडूच्या रूपात सीएसकेने मोईन अलीला संघात कायम केले आहे. या खेळाडूंची निवड करताना सर्वप्रथम सीएसकेने जडेजाला निवडले होते. त्यानंतर धोनी, मोईन अली आणि ऋतुराज यांची निवड केली होती.

व्हिडिओ पाहा- 

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

धोनीनंतर पहिल्यांदाच सीएसकेला मिळणार नवा कर्णधार (CSK New Captain)
दरम्यान जर खरोखरच जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवले गेले, तर तो धोनीनंतर या संघाचे नेतृत्त्व करणारा केवळ दुसरा कर्णधार असेल. धोनीने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सीएसकेचे कर्णधारपद सांभाळले आहे. यादरम्यान त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने ४ वेळा विजेतेपद जिंकले आहे. २०१० साली सीएसकेने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. त्यानंतर २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये सीएसकेने ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

केपटाऊनमधील पराभवानंतर फक्त स्वप्न ते स्वप्नचं राहिलं नाही, तर विराटने ‘नकोशा’ विक्रमांत धोनीची बरोबरीही केलीय

ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याच्या घरी होणार चिमुकल्या पावलांचे आगमन; पत्नीचा फोटो केला शेअर

युवा टीम इंडियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकात राहिलाय दबदबा! रोहितसह ‘या’ खेळाडूंच्या नावावर ऐतिहासिक विक्रम

हेही पाहा-

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---