बलाढ्य संघ चेन्नई सुपर किंग्स संघाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झालेल्या आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २७ धावांनी विजय मिळवला. हा सामना खूपच रोमांचक ठरला. या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र, त्यांच्या पदरी अपयशच आले. या सामन्यात विजय मिळवत सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या खिशात घातली. दरम्यान सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने घेतलेले झेल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
झाले असे की, नाणेफेक जिंकून केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच फलंदाजीसाठी सीएसकेला आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ३ विकेट्स गमावत १९२ धावा ठोकल्या होता, आणि केकेआरला १९३ धावांचे आव्हान दिले होते. (Ravindra Jadeja Catches In CSK vs KKR IPL 2021 Final Match)
पहिला झेल व्यंकटेश अय्यरचा
या आव्हानाचा पाठलाग करताना खेळपट्टीवर केकेआरची शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर ही सलामी जोडी होती. यावेळी चेन्नईकडून ११ वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूर आला होता. शार्दुलच्या चौथ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या अय्यरने जोरदार उंच फटका मारला. त्यावेळी कव्हरवर जडेजा क्षेत्ररक्षण करत होता. त्याने अय्यरचा हा चेंडू चपळतेने झेलला आणि अय्यरला तंबूत धाडले.
https://twitter.com/MUHAMMA18128412/status/1449063611427590144
दुसरा झेल सुनील नरेनचा
यानंतर १२ वे षटक टाकण्यासाठी सीएसकेकडून जोश हेजलवूड आला होता. तो टाकत असलेल्या चौथ्या चेंडूवर केकेआरचा अष्टपैलू सुनील नरेनने जोरदार फटका मारला. यावेळी असे वाटत होते की, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. मात्र, सीमारेषेवर जडेजाने आपला तोल न जाऊ देता हा झेल झेलला आणि नरेनलाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला. जडेजाचे हे दोन्ही झेल नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. या झेलांचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.
दोन्हीही व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
जडेजाची सामन्यातील कामगिरी
सामन्यादरम्यान जडेजाला फलंदाजी करण्याची गरजच पडली नाही. मात्र, जडेजा गोलंदाजीत चमकला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
हेही वाचा-
-टी२० विश्वचषकापूर्वी विराटने रिषभ पंतला दिले चॅलेंज; पूर्ण न केल्यास होऊ शकते संघातून सुट्टी
-बापरे बाप! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय डॉट चेंडू; क्रीझवर ३६० डिग्री फिरला फलंदाज
-अफलातून! सतरा वर्षीय शेफालीने पहिल्याच सामन्यात रॉकेट थ्रो मारून फलंदाजाला केले धावबाद; एकदा पाहाच