शुक्रवारी (२ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा १४वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील चौथा सामना होता. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने एका नव्या विक्रमाची आपल्या खात्यात भर पाडली आहे.
झाले असे की, हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात १६४ धावा केल्या. हैदराबादच्या या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी डावातील १० षटकांच्या आतच ४२ धावांवर संघाच्या ४ विकेट्स गमावल्या.
पण पुढे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि जडेजाने संघाचा डाव सावरला. जडेजाने १४२.८६च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. केवळ ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारत त्याने हा पराक्रम केला. महत्त्वाचे म्हणजे, जडेजाचे हे आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक आहे.
यापुर्वी या धुरंधरने २०१२ साली आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली होती. डेक्कन चार्जर्सविरुद्ध विजागच्या मैदानावर खेळताना त्याने ४८ धावा ठोकल्या होत्या. हीच त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या होती.
२००८ साली या डावखुऱ्या खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत जडेजाने एकूण १७३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.७८च्या सरासरीने १९५० धावा केल्या आहेत. तसेच १४५ डावात गोलंदाजी करताना ११० विकेट्सची खात्यात नोंद केली आहे.
रविंद्र जडेजाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
५० धावा- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०२०
४८ धावा- विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २०१२
४७ धावा- विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०११
४४ धावा- विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१२
महत्त्वाच्या बातम्या-
एका माळेचे मणी! चेन्नईचा संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्वात वयस्कर संघ, पाहा कसं ते…
आयपीएलचे चमकते सितारे! पाहा पहिल्या २ आठवड्यातच युवा खेळाडूंनी केलेली करामत
दोन पोरांनी मिळून अनुभवी चेन्नईला रडवलं! विक्रम तर केलाच, परंतु…
ट्रेंडिंग लेख-
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार