इंडियन प्रिमीयर लीग 2023 हंगाम पार पडला असून, यावेळीचे घवघवीत यश चेंन्नई सुपर किंग्जच्या पदरात पडले. सामन्यादरम्यान शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला यशाची चव चाखवण्याऱ्या रवींद्र जडेजाने आपली बॅट एका राखीव खेळाडूला भेट दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळणाऱ्या अजय मंडलला सीएसकेने आपल्या संघासाठी विकत घेतले होते. मात्र, त्याला फ्रँचायझीकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर चला जाणून घेऊ जडेजाने त्याची ही करिष्माई बॅट अजयला का भेट दिली.
बॅटचा फोटो व्हायरल, चाहते खुश
सर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध दोन चेंडूमध्ये सीएसके संघाला जोरदार विजय मिळवून दिला. त्यानंतर जडेजाने मला आशीर्वाद म्हणून त्याची विजयाची बॅट दिली. मला ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल मी चेन्नई सुपर किंग्जचे खूप खूप आभार मानतो. दरम्यान, अजयची ही इंस्टाग्राम स्टोरी जोरदार व्हायरल झाली असून चाहते देखील त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. (Indian Premier League 2023)
अजय मंडल आहे तरी कोण ?
सीएसके संघातील डावखुरा फलंदाज अजय (Ajay Mandal) छत्तीसगडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. फलंदाजीसोबतच अजय फिरकी गोलंदाजीही चमकदारपणे करतो. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजयला 29 प्रथम श्रेणी, 23 लिस्ट ए आणि 34 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव देखील आहे. अजयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1320 धावा आपल्या नावावर केल्या. तर लिस्ट A मध्ये 375 धावा आणि T20 मध्ये 246 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत प्रथम श्रेणीत 103 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने लिस्ट ए मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत तर टी-20 क्रिकेटमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.
सीएसकेने 5 गडी राखून अंतिम सामना जिंकला
सीएसकेने (Chennai Super Kings) IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात विरुद्ध 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 214 धावांची मोठी धावसंख्या सीएसके समोर उभी केली. मात्र, पावसामुळे सामन्याची खेळी बदलावी लागली. सीएसकेला 15 षटकांत 171 धावा करायच्या होत्या. या धावसंख्येला पार करत जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून महेंद्र सिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) आगळी वेगळी भेट दिली आहे. अशाप्रकारे CSK पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
‘त्याला स्वत:ला सिद्ध करावंच लागेल…’, टीम इंडियातील रहाणेच्या पुनरागमनावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
आता कशी आहे रिषभ पंतची तब्येत? ‘गब्बर’ने भेट घेऊन दिली अपडेट





