दुबई। 25 सप्टेंबरला भारताचा एशिया कप 2018 मधील सुपर फोरचा तिसरा सामना पार पडला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झाला. अखेर नाट्यपूर्ण झालेला हा सामना बरोबरीत सुटला.
या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूंवर १ धाव हवी असताना भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा बाद झाला.
यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. यामुळे जडेजाच्या नावावर मात्र एक विचित्र विक्रम झाला. १३९ वन-डे सामने खेळलेला जडेजा आजपर्यंत केवळ दोन सामन्यांत धावांचा पाठलाग ५०व्या षटकांपर्यंत खेळला आहे. आणि हे दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहे.
यापुर्वी २५ जानेवारी २०१४ मध्ये आॅकलॅंड वन-डेत शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना जडेजा एक धाव काढत नाबाद राहिला होता.
महत्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट
–अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!
–Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार