भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चेंडूवर चांगली कामगिरी केली नाही, मात्र वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जडेजाची समाधानकारक कामगिरी राहली. मुंबईत त्याने गोलंदाजीत आपली जादू दाखवली असून या सामन्यात त्याने आतापर्यंत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत जडेजाला 10 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने आणखी एक महान कामगिरी केली. ज्यामध्ये त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या सर्कलमध्ये 50 बळी पूर्ण केले.
मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा रवींद्र जडेजाने किवी संघाच्या दुसऱ्या डावात मॅट हेन्रीची विकेट घेतली, तेव्हा त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच (WTC 2023-25) मध्ये 50 बळी पूर्ण केले. यासह जडेजा आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या सर्कलमध्ये 50 बळी घेणारा रविचंद्रन अश्विननंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. जडेजाने 2021-23 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 13 मॅचमध्ये 47 विकेट घेतल्या होत्या. गेल्या काही वर्षात रवींद्र जडेजा केवळ मायदेशातच नव्हे तर परदेश दौऱ्यांवरही बॉल आणि बॅटने कसोटीत टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे, त्यामुळे कर्णधार रोहित शर्माही त्याच्या मुंबई टेस्टच्या या कामगिरीवर खूप खूश असेल.
भारतीय संघाचे डोळे मुंबई कसोटी सामन्यात विजयाकडे लागले आहेत. परंतु हा मार्ग अजिबात सोपा होणार नाही. कारण चौथ्या डावात वानखेडेच्या खेळपट्टीवर जवळपास 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होईल. अशा स्थितीत हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला शेवटच्या डावात चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मुंबईच्या मैदानावर चौथ्या डावात केवळ एकदाच 150 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात कोणत्याही संघाला यश आलेले नाही.
हेही वाचा-
फक्त 37वा सामना… पंतने मोडला धोनीचा कसोटी विक्रम, गिलख्रिस्टचा विश्वविक्रमही धोक्यात!
शतक हुकल्यानंतरही शुबमन गिलने केली कमाल, कसोटीत केला ‘हा’ पराक्रम
कोहलीचा निवृत्तीच्या अफवांवर पूर्णविराम, सांगितले किती दिवस आरसीबीसाठी खेळणार?