---Advertisement---

IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

On: सोमवार, जानेवारी 29, 2024 12:18 PM
Ravindra Jadeja KL Rahul
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी संपला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंगलंडने 28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे महत्वाचा असेल. पण त्याआधीच संघाची डोकेदुखी वाढवणारी एक बाब समोर येत आहे.

भारताया अष्टपैलू रविंद्र जडेजा मालिकेतीय या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 5 विकेट्स घेततल्या. जडेजाने पहिल्या डावात सर्वाधिक 87 धावांची खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात तो अवघ्या 2 धावा करून धावबाद झाला. बेन स्टोक्स याने अप्रतिम थ्रो करून त्याला तंबूत धाडले. याचदरम्यान आपली विकेट वाचवताना जडेजाच्या पायाला दुखापत झाली होती. आता याच दुखापतीमुळे जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकू शकतो. उभय संघांतील हा दुसरा सामना विशाखापट्टनममध्ये खेळला जाणार आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार हैदराबाद कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विकेट गमावल्यानंतर जडेजा वेदनेत पाहायला मिळाला होता. मैदानातून बाहेर गेल्यानंतर त्याला झालेली दुखापत स्कॅन देखील केली गेली. पण अद्याप या चाचणीचा अहवाल समोर आला नाहीये. जडेजाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये तान आल्याचे बोलले जात आहे. पण त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखावले गेले असेल, तर संघासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

सूत्राच्या हवाल्याने क्रिकबजने अशी माहिती दिली आहे की, “आम्हाला जेवढी माहिती मिळाली आहे, त्यावर असे समजते की, हॅमस्ट्रिंगमध्ये तान आला आहे. टियर (गंभीर दुखापत) नाहीये. अशात जर जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. तरी तिसऱ्या सामन्यासाटी तो पुन्हा संघात सामील झाला पाहिजे.”

दरम्यान, हैदराबाद कसोटीच्या शेवटच्या डावात भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारताचा एकही फलंदाज या डावात अर्धशतक करू शकला नाही. परिणामी भारताचा शेवटचा डाव 202 धावांमध्ये गुंडाळला गेला. हैदराबादमध्ये इंग्लंडला भारताविरुद्ध मिळालेला हा पहिलाच विजय होता. (Ravindra Jadeja may withdraw from the second Test against England)

महत्वाच्या बातम्या – 
Australian Open । यानिक सिनरने रचला इतिहास, 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया ओपनला मिळाला नवा चॅम्पियन
IND vs ENG । भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंसाठी वाजली धोक्याची घंटा! पुढच्या कसोटीतून होऊ शकतो पत्ता कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---