भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (६ मार्च) संपला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. विजय मिळवून देण्यासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे योगदान बहुमूल्य राहिले. अप्रतिम प्रदर्शनासाठी जडेजाला सामनावीर निवडले गेले. हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला असून विजयात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जडेजाने हे मैदान त्याच्यासाठी भाग्यशाली असल्याचे सांगितले आहे.
रविवारी सामना जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, “मी असे नक्कीच म्हणेल की, हे मैदान माझ्यासाठी भाग्यशाली आहे. मी इथे जेव्हा कधी येतो, तेव्हा चांगले प्रदर्शन करतो. तेव्हा मी रिषभ पंतला फलंदाजी करताना पाहत होतो आणि स्वतः संयमाने फलंदाजी करत होतो. ही एक मोठी भागीदारी बनावी यासाठी प्रयत्न करत होतो. जर इमानदारीने सांगायचे झाले, तर आकडे किंवा विक्रमांविषयी मला जास्त माहितीच नव्हते.”
“मी खुश आहे की, मी चांगले प्रदर्शन केले. जेव्हा तुम्ही असे चांगले प्रदर्शन करता, तेव्हा समाधान वाटते. मी फलंदाजीत काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाहीय. फक्त स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला आहे आणि पुढे गेलो आहे. मी सेट होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर स्वतःचे शॉट खेळतो. मी माझी खेळी सरळ-सोपी ठेवण्याचा प्रयत्न करतो.” असे जडेजा पुढे बोलताना म्हणाला.
पहिल्या सामन्यात सोपा विजय मिळवल्यानंतर भारताला १२ फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. मालिकेतील हा सामना दिवस-रात्र स्वरुपातील असेल आणि गुलाबी चेंडूने खेळला जाईल. याविषयी बोलताना जडेजा म्हणाला, “मी गुलाबी चेंडूचा सामना कधीच खेळला नाही, त्यामुळे हे काहीतरी नवीन असणार आहे. अपेक्षा आहे की, काही दिवस सराव केल्यानंतर मी यासाठी तयार होईल.”
पहिल्या सामन्यातील भारताच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर नाणेफेक जिंकून संघाने प्रथम फलंदाजी केली आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ पहिल्या डावात १७४ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारातने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही श्रीलंका संघाने अवघ्या १७८ धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. परिणामी भारतने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
कर्नाटकचा ‘हा’ युवा फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचं दार, गेल्या २ वर्षांपासून आहे तुफान फॉर्ममध्ये
मोठ्या मनाचा माणूस! संघातील तिसऱ्या फिरकीपटूला संधी देण्यासाठी ‘जड्डू’ झाला उदार; पाहा काय केलंय
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद